दिव्या देशमुखचा राज्य सरकारकडून सन्मान(फोटो-सोशल मीडिया)
Divya Deshmukh becomes Women’s Chess World Champion: नुकताच फिडे महिला बुद्धिबळ विश्वचषक २०२५ मध्ये नागपूरच्या दिव्या देशमुखने विजय प्राप्त केला आहे. दिव्याने जॉर्जियातील बटुमी येथे खेळल्या गेलेल्या २०२५ च्या FIDE विश्वचषक स्पर्धेत तिने भारताच्याच ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला पराभूत केले. या विजयाने दिव्या देशमुखनेने देशाची मान उंचावली आहे. या कामगिरीची दखल राज्य सरकारने घेतली आहे. भारताच्या ८८ व्या ग्रँडमास्टर असलेल्या नागपूरच्या दिव्या देशमुखला महाराष्ट्र शासनाने विशेष सन्मान देऊन ३ कोटी रुपये रोख बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दिव्याचा सन्मान करण्यात आला. नागपूरला हा सोहळा पार पडला.
हेही वाचा : IND vs ENG 5th Test : शुभमन गिलची गाडी सुसाट! ओव्हल येथे रचला इतिहसा; मोडला ग्राहम गूचचा विक्रम
या वेळी दिव्याच्या सत्कार समारंभाला मुख्यमंत्री फडणवीस यांचेसह क्रीडा मंत्री मानिकराव कोकाटे, माजी आमदार अॅड. आशिष जयस्वाल, तसेच महाराष्ट्र बुद्धिबळ संघटनेचे अध्यक्ष परिणय फुके उपस्थित होते.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “हा सन्मान फक्त नागपूरचा नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र आणि देशासाठी अभिमानाचा असा क्षण आहे. क्रिकेटप्रमाणेच बुद्धिबळसुद्धा व्यावसायिक स्वरूप घेत असून शासन याला पूर्ण सहकार्य करत आहे.” दिव्याने नुकत्याच झालेल्या विश्वचषकाच्या अंतिम फेरीत आपल्याच देश बांधव असणाऱ्या अनुभवी ग्रँडमास्टर कोणेरू हम्पीला टायब्रेकमध्ये १.५-०.५ नी पराभूत करत, इतिहास रचला होता. त्यामुळे १९ व्या वर्षी विजय मिळवत ती सर्वात तरुण विश्वविजेती ठरली आहे आणि ग्रँडमास्टरपद देखील प्राप्त केलं.
या विजयानंतर दिव्या देशमुखला २०२६ च्या कॅन्डिडेट्स टुर्नामेंटमध्ये सहभागाचा आणि GM पदाचाही मान मिळाला आहे. या वेळी दिव्या म्हणाली की, “मी लहान मुलांना प्रेरणा देण्यासाठी ही कामगिरी केली याचा मला आनंद आहे”
दिव्या देशमुख हिच्या बुद्धिमत्ता आणि चिकाटीसाठी राज्य शासनाची कौतुकाची थाप!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज नागपूर येथे 2025च्या FIDE महिला विश्वचषकाची विजेती भारताची पहिली महिला ग्रॅन्डमास्टर दिव्या देशमुख यांचा भव्य ‘नागरी सन्मान सोहळा’ संपन्न झाला. यावेळी… pic.twitter.com/CPK0gCvCLC
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 2, 2025
हेही वाचा : ‘कधीकधी अंतर तुम्हाला..’, फुलराणीचा चाहत्यांना सुखद धक्का; सायना नेहवाल आणि पती पारुपल्ली कश्यप पुन्हा एकत्र
भारताच्या दोन्ही खेळाडूंनी चिनी भिंत तोडून अंतिम फेरीत प्रवेश केला. फिडे विश्वचषक नॉकआउट स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचण्यासाठी, ३८ वर्षीय कोनेरू हम्पी आणि १९ वर्षीय दिव्या देशमुख यांनी या स्पर्धेत अनेक चिनी खेळाडूंवर मात केली. महिला गटात चीन टॉप १०० मध्ये अव्वल स्थानावर आहे. चीनच्या १४ खेळाडूंनंतर, भारतातील ९ खेळाडू टॉप १०० मध्ये येतात. परंतु फिडे विश्वचषकामध्ये कोनेरू आणि दिव्या यांनी बलाढ्य मानल्या जाणाऱ्या चिनी खेळाडूंना पराभूत करत भारताचा दबदबा दाखवला.