क्रिस्टियानो रोनाल्डो(फोटो-सोशल मीडिया)
Will Cristiano Ronaldo retire? : फुटबॉलप्रेमींसाठी एक निराशाजनक बातमी समोर आली आहे. पोर्तुगाल आणि अल नासर फुटबॉलचा दिग्गज क्रिस्टियानो रोनाल्डो लवकरच फुटबॉलमधून निवृत्त होण्याच्या तयारीत आहे. ४० वर्षीय स्टार खेळाडूने सांगितले की त्याची गौरवशाली कारकीर्द संपुष्टात येणार आहे. तसेच त्याचे म्हणे आहे की, खेळाला निरोप देताना खूप भावनिक क्षण असणार आहे. रोनाल्डोने पियर्स मॉर्गन अनसेन्सर्डला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्याच्या निवृत्ती आणि भविष्यातील योजनांबद्दल माहिती दिली.
क्रिस्टियानो रोनाल्डो म्हणाला की, “लवकरच, पण मी तयार होणार आहे. ते कठीण होईल, हो, मी रडू देखील शकतो. मी भावनिक व्यक्ती आहे. पण मी २५-२६ वर्षांच्या वयात माझ्या भविष्याची तयारी सुरू केली होत, म्हणून मला विश्वास आहे की मी ते हाताळू शकणार आहे.”जगातील सर्वात यशस्वी खेळाडूंपैकी एक असणाऱ्या रोनाल्डोने आतापर्यंत त्याच्या कारकिर्दीत ९५२ गोल डागले आहेत. तो म्हणाला की तो फुटबॉलनंतरचे त्याचे आयुष्य त्याच्या कुटुंबासाठी आणि वैयक्तिक हितासाठी समर्पित करणार आहे.
क्रिस्टियानो रोनाल्डो पुढे म्हणाला की, “फुटबॉलमध्ये गोल करण्याच्या उत्साहासोबत काही देखील जोडता येत नाही. पण प्रत्येक गोष्टीची सुरुवात आणि शेवट हा असतोच. आता मला माझ्या कुटुंबासोबत आणि मुलांसोबत जास्त वेळ घालवायचा आहे. मला क्रिस्टियानो ज्युनियरसोबत राहायचे आहे कारण तो अशा वयात आहे जिथे मुले खूप चुका करत असतात. माटेओलाही फुटबॉल खूप आवडतो.” रोनाल्डो असे देखील उघड केले की त्याला आता त्याच्या मित्रांसोबत पॅडल खेळायला देखील आवडते.
रोनाल्डोने त्याच्या व्यावसायिक कारकिर्दीची सुरुवात ही स्पोर्टिंग लिस्बनमधून केली होती. त्यानंतर तो मँचेस्टर युनायटेड, रिअल माद्रिद आणि युव्हेंटस सारख्या दिग्गज क्लबसाठी खेळलेला. मँचेस्टर युनायटेडसोबत, त्याने तीन प्रीमियर लीग जेतेपदे आणि एक चॅम्पियन्स लीग ट्रॉफी देखील जिंकली आहे, तसेच रिअल माद्रिदसोबत, त्याने दोन ला लीगा जेतेपदे आणि चार चॅम्पियन्स लीग जेतेपदावर नाव कोरले आहे.
रोनाल्डोने २०२२ मध्ये युनायटेड सोडल्यानंतर, तो सौदी अरेबियाच्या क्लब अल नसरचा भाग झाला. तथापि, तो अजून देखील मँचेस्टर युनायटेडच्या निकालांवर लक्ष ठेवतो, कारण त्याचा माजी पोर्तुगीज संघमित्र रुबेन अमोरिम आता क्लबचा व्यवस्थापक आहे.
युनायटेडच्या सध्याच्या परिस्थितीबद्दल रोनाल्डोने सांगितले की, “तो (अमोरिम) सर्वोत्तम कामगिरी आहे, पण कोणाला देखील चमत्कार करू शकत नाही. संघात प्रतिभा आहे, परंतु काही खेळाडूंना मँचेस्टर युनायटेड म्हणजे काय हे समजून घेणे आवश्यक आहे. हा क्लब अजून देखील माझ्या हृदयात आहे, परंतु वास्तव हे आहे की, योग्य मार्गावर नाहीत. बदल हा आवश्यक असून केवळ प्रशिक्षक किंवा खेळाडूंमध्येच नाही तर संपूर्ण व्यवस्थेत गरजचे आहे.” असे देखील रोनाल्डोने म्हटले आहे.






