जसप्रीत बुमराह(फोटो-सोशल मीडिया)
Jasprit Bumrah creates history against Australia : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेतील चौथा सामना आज खेळवण्यात आला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ४८ धावांनी परभव केला. हा सामाना गोल्ड कोस्टमधील कॅरारा ओव्हलवर खेळला गेला. या सामन्यात जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या इतिहास रचला आहे. बूमराहने माजी पाकिस्तानी फिरकी गोलंदाज सईद अजमलचा विक्रम मोडून एक महत्त्वाच्या टप्प्याला गवसणी घातली आहे. या सामन्यापूर्वी बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १६ डावात १८ बळी टिपले होते, तर ११ डावात १९ बळी घेणाऱ्या सईद अजमलची बरोबरी साधली आहे.
चौथ्या सामन्यात एक बळी घेत बुमराह ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-२० सामन्यात सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज बनला आहे. पाकिस्तानचा मोहम्मद अमीर १७ डावात १० बळींसह यादीत तिसऱ्या स्थानी विराजमान आहे. न्यूझीलंडचा मिचेल सँटनर १२ डावात १७ बळींसह चौथ्या स्थानावर आहे.
गोल्ड कोस्टमधील चौथ्या टी-२० सामन्यात भारताने आपली शानदार कामगिरी करत ऑस्ट्रेलियाला ४८ धावांनी धूळ चारली. या विजयासह टीम इंडियाने पाच सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी आघाडी मिळवली आहे.
नाणेफेक गमावणाऱ्या भारताने प्रथम फलंदाजी करत २० षटकांत ८ बाद १६७ धावा केल्या. संघाची सुरुवात चांगली झाली, अभिषेक शर्माने २१ चेंडूत २८ धावा केल्या. दरम्यान, शुभमन गिलने शानदार फलंदाजी करत ३९ चेंडूत ४६ धावांची खेळी केली.तर शिवम दुबेने १८ चेंडूत २२ धावा केल्या, तर कर्णधार सूर्यकुमार यादवने २० धावांचे योगदान दिले.
लक्ष्याचा पाठलाग करताना, ऑस्ट्रेलियन संघ सुरुवातीला दमदार वाटला. परंतु भारतीय गोलंदाजांनी केलेली टिच्चून गोलंदाजीने ऑस्ट्रेलिया संघ अडचणीत आला. कर्णधार मिशेल मार्शने २४ चेंडूत ३० धावा केल्या, तर मॅथ्यू शॉर्टने १९ चेंडूत २५ धावांचे योगदान दिले. त्यानंतर संपूर्ण संघ १८.२ षटकांत ११९ धावांवर सर्व बाद झाला.
हेही वाचा : ‘या’ स्टेडियममध्ये रंगणार T20 World Cup 2026 स्पर्धेचा अंतिम सामना! BCCI कडून मोठी घोषणा
भारतीय शानदार गोलंदाजी
भारतीय गोलंदाजांनी ऑस्ट्रेलियाविरुद्ध शानदार गोलंदाजी केली आणि आपला दबदबा राखला. वॉशिंग्टन सुंदरने तीन बळी घेतले, तर अक्षर पटेल आणि शिवम दुबेने प्रत्येकी दोन बळी टिपण्यात यश मिळवले.






