फोटो सौजन्य - X सोशल मीडिया
CSK vs PBKS head to head record : चेन्नई सुपर किंग्सचा पुढील सामना पंजाब किंग्सविरुद्ध खेळवला जाणार आहे. हा सामना ३० एप्रिल रोजी ४९ वा सामना खेळवला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या होमग्राउंडवर म्हणजेच एमए चिदंबरम स्टेडियमवर होणार आहे. या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या संघाने निराशाजनक कामगिरी केली आहे. संघाने या सीझनमध्ये आतापर्यत ९ सामने खेळले आहेत यामध्ये त्यांनी फक्त २ सामन्यात विजय मिळाला आहे इतर सर्व सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. त्यांच्याकडे फक्त ४ गुण आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये तळाशी १० व्या क्रमांकावर आहेत. चेन्नईला गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबादकडून पराभव पत्करावा लागला होता.
चेन्नईचा मूळ कर्णधार ऋतुराज गायकवाड याला चालू स्पर्धेत दुखापतीमुळे बाहेर व्हावे लागले आहे. त्याच्यानंतर एमएस धोनीने चेन्नई सुपर किंग्सची कमान सांभाळली आहे. पण एमएस धोनीच्या नेतृत्वात संघ विशेष कामगिरी करू शकला नाही. या सीझनमध्ये चेन्नई सुपर किंग्सच्या फलंदाजांनी अत्यंत निराशाजनक कामगिरी केली आहे. उद्या म्हणजेच ३० एप्रिल रोजी त्यांचा घरच्या मैदानावर सामना होणार आहे. आतापर्यत दोन्ही संघामधील हेड टू हेड आकडेवारी काय आहे यावर एकदा नजर टाका.
पंजाब किंग्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग यांच्यामध्ये आयपीएल स्पर्धेत ३१ सामने खेळवण्यात आले आहेत. यामध्ये १६ सामन्यांमध्ये चेन्नई सुपर किंग्सला विजय मिळाला आहे तर १५ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. पंजाब किंग्सने झालेल्या चेन्नईविरुद्ध ३१ सामान्यांमधील १५ सामन्यात विजय मिळाला आहे तर १६ सामन्यात त्यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे. आयपीएल २०२५ मध्ये ३० एप्रिल रोजी चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स यांच्यामध्ये दुसऱ्यांदा लढत होणार आहे.
वैभव सूर्यवंशीने कोणाला केला पहिला कॉल? व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल भावुक, Video Viral
दुसरीकडे, पंजाब किंग्जबद्दल बोलायचे झाले तर, त्यांनी ९ सामने खेळले आहेत, त्यापैकी ५ सामने जिंकले आहेत. त्यांचे १० गुण आहेत आणि ते पॉइंट टेबलमध्ये ५ व्या स्थानावर आहेत. पंजाबचा शेवटचा सामना कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध होता, जो पावसामुळे रद्द झाला. आयपीएलमध्ये चेन्नई आणि पंजाब यांच्यात आतापर्यंत ३१ सामने खेळले गेले आहेत. यापैकी चेन्नईने १६ सामने जिंकले आहेत, तर पंजाबने १५ सामने जिंकले आहेत. या हंगामात हे दोन्ही संघ एकदा आमनेसामने आले आहेत, ज्यामध्ये पंजाबने चेन्नईचा १८ धावांनी पराभव केला.