सौजन्य - सोशल मीडिया चेन्नई सुपर किंग्सने IPL 2025 साठी 'या' 5 खेळाडूंना ठेवले कायम
IPL 2025 CSK Team Players List : भारतीय क्रिकेटर रविचंद्रन अश्विन सध्या इंटरनेटवर वर्चस्व गाजवत आहे. यापूर्वी त्यांनी मॉक ऑक्शन करून खूप चर्चेत आणले होते. आता त्याने ‘द अल्टीमेट ऑक्शन’ नावाचा कार्यक्रम आयोजित केला होता, ज्यामध्ये चेन्नई सुपर किंग्जचा एक संघ तयार करण्यात आला आहे, ज्यामध्ये अनेक नवीन चेहरे दिसत आहेत. CSK ने IPL 2025 पूर्वी एकूण पाच खेळाडूंना रिटेन केले होते. एमएस धोनी, रवींद्र जडेजा, रुतुराज गायकवाड, मथिशा पाथिराना आणि शिवम दुबे अशी या पाच खेळाडूंची नावे आहेत.
CSKच्या 12 खेळाडूंची यादी
या ‘द अल्टीमेट ऑक्शन’मध्ये CSKच्या 12 खेळाडूंची यादी तयार करण्यात आली असून, 7 खेळाडूंना बॅकअप म्हणून ठेवण्यात आले आहे. चेन्नईने पाच खेळाडूंना कायम ठेवले आहे आणि ‘द अल्टिमेट ऑक्शन’च्या यादीनुसार, CSK ने राईट टू मॅच कार्ड वापरून डेव्हॉन कॉनवेला परत विकत घेतले आहे. चेन्नईने गायकवाड आणि जडेजा यांना 18 कोटी रुपयांमध्ये रिटेन केले होते. या लिलावात चेन्नईने खरेदी केलेला सर्वात महागडा खेळाडू टी नटराजन आहे, ज्याला 10 कोटींची बोली लागली.
‘द अल्टिमेट ऑक्शन’नुसार CSK संघ : रुतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, राहुल त्रिपाठी, शिवम दुबे, एडन मार्कराम, रवींद्र जडेजा, एमएस धोनी, सॅम कुरन, रविचंद्रन अश्विन, राहुल चहर, मथिशा पाथीराना, टी नटराजन, रोमॅरियो शेफर्ड, शेरफान रदरफोर्ड, विल्यम ओ’रुर्के, यश ठाकूर, राजवर्धन, हंगरगेकर, अथर्व तावडे, सुयश प्रभुदेसाई.
CSK च्या पर्समध्ये किती पैसे शिल्लक आहेत?
चेन्नई सुपर किंग्सने आयपीएल 2025 साठी पाच खेळाडूंना कायम ठेवण्यासाठी 65 कोटी रुपये खर्च केले आहेत. चेन्नईने पाच खेळाडूंना रिटेन केले असून लिलावासाठी फ्रँचायझीने किमान १८ खेळाडूंचा संघ तयार करावा. याचा अर्थ CSK ला उर्वरित 55 कोटी रुपयांमध्ये किमान 13 खेळाडू खरेदी करावे लागतील. आयपीएल 2025 मध्ये देखील ऋतुराज गायकवाड संघाचे नेतृत्व करणार आहेत.
हेही वाचा : क्रिकेटच्या मैदानावरच भीषण अपघात; मृत्यूशी झुंज देतोय ‘हा’ अंपायर; ग्राऊंडवरच घडला हृदयद्रावक प्रसंग
हेही वाचा : क्रिकेटच्या मैदानावरच भीषण अपघात; मृत्यूशी झुंज देतोय ‘हा’ अंपायर; ग्राऊंडवरच घडला हृदयद्रावक प्रसंग