जेमिमाह रॉड्रिग्स आणि स्मृती मानधना(फोटो-सोशल मीडिया)
MI vs UPW, WPL 2026 LIVE : महिला प्रीमियर लीग २०२६ मध्ये आज नवी मुंबई येथील डॉ. डी. वाय पाटील स्टेडियमवर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामध्ये सामना होत आहे. या सामन्यापूर्वी करण्यात आलेल्या नाणेफेकीत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने बाजी मारत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर दिल्ली कॅपिटल्स संघ प्रथम फलंदाजीसाठी मैदानात उतरणार आहे.
हेही वाचा : T20 World Cup 2026 : बांगलादेशची मुजोरी कायम! भारतीय आयसीसी अधिकाऱ्याला नाकारला व्हिसा
स्मृती मानधनाने टॉस जिंकल्यावर प्रतिक्रिया दिली. टि म्हणाली की, “आम्हाला प्रेक्षकांचा चांगला पाठिंबा मिळाल्याने खूप आनंद झाला आहे. त्यामुळे नक्कीच, म्हणजे, प्रत्येकजण मोठ्या संख्येने आले आहेत आणि आज खूप उत्साहित आहेत. आम्हाला आज प्रथम क्षेत्ररक्षण करायला आवडेल. आज आमच्या संघात तीन बदल आहेत. लिंडसेच्या जागी वोल, हेमाच्या जागी प्रेमा आणि सिडली संघात आली आहे. दुर्दैवाने अरु आजारी असल्यामुळे ती खेळू शकणार नाही. दुर्दैवाने, अरु आजारी असल्यामुळे, आम्हाला तो एक सक्तीचा बदल करावा लागला. आणि मग नक्कीच, आम्हाला नेहमीच वाटत होते की एक चांगला पर्याय उपलब्ध आहे.”
टॉस गमावणारी दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार रॉड्रिग्स जेमिमाने प्रतिक्रिया देत म्हटले की, “तुम्हाला माहिती आहे, आम्ही फलंदाजी किंवा गोलंदाजी दोन्हीसाठी आनंदी होतो, कारण कधीकधी नाणेफेक हरणे चांगले असते – कारण ही त्यांच्यासाठी चौथी फलंदाजीची संधी असेल. त्यामुळे मला वाटते की कधीकधी हे चांगले असते, आणि आमची खेळण्याची रणनीती बऱ्यापैकी तशीच राहणार आहे. आमच्या संघात एक बदल आहे. गेल्या सामन्यातील दुखापतीमुळे हेन्री बाहेर आहे, आणि तिच्या जागी लुसी संघात आली आहे आणि आज पदार्पण करत आहे.”
हेही वाचा : INDU19 vs BANU19: वैभव सूर्यवंशीचा विश्वचषकात धुराळा! युवा एकदिवसीय सामन्यांमध्ये मोडला विराट कोहलीचा विक्रम
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू प्लेइंग इलेव्हन: ग्रेस हॅरिस, स्मृती मानधना (क), जॉर्जिया वॉल, रिचा घोष (डब्ल्यू), गौतमी नाईक, नादिन डी क्लर्क, राधा यादव, प्रेमा रावत, श्रेयंका पाटील, सायली सातघरे, लॉरेन बेल
दिल्ली कॅपिटल्स प्लेइंग इलेव्हन: शफाली वर्मा, लिझेल ली (डब्ल्यू), लॉरा वोल्वार्ड, जेमिमाह रॉड्रिग्स (क), मारिझान कॅप, लुसी हॅमिल्टन, स्नेह राणा, निकी प्रसाद, मिन्नू मणी, नंदनी शर्मा, श्री चरणी
बातमी अपडेट होत आहे….






