फोटो सौजन्य - Delhi Capitals सोशल मीडिया
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध युपी वॉरियर्स : शनिवारी म्हणजेच आज २२ फेब्रुवारी रोजी दिल्ली कॅपिटल्स युपी वॉरियर्स आमनेसामने असणार आहेत. महिला प्रीमियर लीग सामन्यात दिल्ली कॅपिटल्स यूपी वॉरियर्सशी सामना करताना अव्वल स्थान मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर यूपी संघ हंगामातील पहिला विजय नोंदवण्याचा प्रयत्न करेल. सध्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूनंतर पॉइंट टेबलमध्ये दुसऱ्या स्थानावर असलेल्या दिल्लीने तीनपैकी दोन सामने जिंकले आहेत या दोन विजयासह दिल्लीचा संघ तिसऱ्या स्थानावर आहे. दुसरीकडे, सलग दोन सामने गमावल्यानंतर यूपी वॉरियर्स तळाशी आहे.
दोन्ही संघांमधील वडोदरा येथे झालेल्या शेवटच्या सामन्यात दिल्लीने सात विकेट्सने विजय मिळवला होता. स्पर्धेपूर्वी जेतेपदाचा प्रबळ दावेदार मानला जाणारा दिल्ली संघ कर्णधार मेग लॅनिंगच्या फॉर्ममध्ये परतण्याने बळकट झाला आहे. याशिवाय, मारियान कॅप आणि अॅनाबेल सदरलँड यांनी मधल्या फळीत चांगले योगदान केले आहे.
Only one thing on our minds: 𝐑𝐄𝐃𝐄𝐌𝐏𝐓𝐈𝐎𝐍 👊🔥#UPWarriorz #DCvUPW pic.twitter.com/wzO9KGCOKU
— UP Warriorz (@UPWarriorz) February 22, 2025
सलामीवीर शफाली वर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. शिखा पांडेने गोलंदाजीत चांगली कामगिरी केली आहे पण तिला दुसऱ्या टोकाकडून साथ मिळत नाहीये. यूपी वॉरियर्सचा कमकुवत दुवा क्षेत्ररक्षण होता ज्याच्या खेळाडूंनी तीन झेल चुकवले आणि अनेक मिसफिल्डिंग केले ज्याची त्यांना किंमत मोजावी लागली.
शेवटचा सामना गमावल्यानंतर कर्णधार दीप्ती शर्मा म्हणाली होती, ‘जर आपण झेल घेऊ शकलो असतो तर निकाल वेगळा असता पण हे सर्व घडतच राहते.’ दीप्ती, उमा छेत्री आणि सलामीवीर फलंदाज वृंदा दिनेश यांना चांगली खेळी खेळावी लागेल. किरण नवगिरे यांनी आक्रमक अर्धशतक झळकावले पण श्वेता सेहरावत आणि चिनेल हेन्री वगळता इतर फलंदाज कामगिरी करण्यात अपयशी ठरले.
यूपी वॉरियर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स यांच्यामधील सामना बंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमवर आयोजित करण्यात आला आहे. हा सामना संध्याकाळी ७.३० वाजता सुरु होणार तर या सामन्याचे नाणेफेक ७ वाजता होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्सवर होणार आहे तर लाईव्ह स्ट्रीमिंग जिओस्टारवर होणार आहे.
पॉईंट टेबलमध्ये युपीचा संघ शेवटच्या पाचव्या स्थानावर आहे, संघाने अजुनपर्यत एकही सामना जिंकलेला नाही. तर चौथ्या स्थानावर गुजरात जायंट्सचा संघ आहे. तिसऱ्या स्थानावर दिल्ली कॅपिटल्सचा संघ तर दुसऱ्या स्थानावर मुंबई इंडिअन्सचा संघ आहे तर पहिल्या स्थानावर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ विराजमान आहे.