फोटो सौजन्य - Shubhankar Mishra युट्युब
रोहित शर्माला कर्णधार पदावरून का हटवले : नुकताच अमित मिश्राने (Amit Mishra) एक मुलाखत दिली आहे, यामुळे तो सोशल मीडियावर सध्या चर्चेत आहे. त्याच्या या मुलाखतीमुळे अनेक वाद पुन्हा उकळले आहेत. विराट कोहलीबद्दल सुद्धा त्याने या मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. यामुळे त्याला आता सोशल मीडियावर ट्रोलिंगचा सामना सुद्धा करावा लागत आहे. त्याने आता शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टमध्ये त्याने रोहित शर्माबद्दल सुद्धा वक्तव्य केले आहे. त्यामुळे आता रोहित शर्माचे (Rohit Sharma) आयपीएलमधील कर्णधारपद चर्चेत आले आहे. रोहित शर्माचे कर्णधार पदावरून त्याला काढण्यात आले की त्याने सोडले असा प्रश्न वारंवार चाहत्यांना होता त्याचा मोठा खुलासा अमित मिश्राने त्याच्या मुलाखतीमध्ये केला आहे.
शुभंकर मिश्राच्या या पॉडकास्टमध्ये त्याने रहस्ये उघड झाली आहेत. यावेळी त्याने उघड केले की रोहित शर्माकडून मुंबई इंडियन्सचे कर्णधारपद हिसकावून घेण्यात आले होते. आयपीएल २०२४ सुरू होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून हार्दिक पांड्याला कर्णधार बनवले होते.
अमित मिश्राने मुलाखतीमध्ये सांगितले की, रोहित शर्माला मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून हटवल्याने खूप दु:ख झाले आहे. अमित मिश्राच्या म्हणण्यानुसार, रोहितला या निर्णयाच्या आधीच माहिती देण्यात आली नव्हती, त्यामुळे तो आणखीनच संतापला होता. शुभंकर मिश्रा यांच्या पॉडकास्टवर अमित मिश्राने हा खुलासा केला आहे. तो म्हणाला, “तो आयपीएलमध्ये खूश नव्हता. त्यामुळे रोहित १०० टक्के नाराज झाला असावा कारण तो भावनिक माणूस आहे.”
यंदा मुंबई इंडियन्सच्या कर्णधारपदावरून अनेक वाद पाहायला मिळाले. त्यामुळे भारताचा अष्टपैलू हार्दिक पांड्याला सुद्धा यामुळे ट्रोलिंगचा सामना करावा लागला होता. आयपीएल २०२४ च्या मुंबई इंडियन्सच्या कामगिरीचा विचार केला तर संघाने यंदा अत्यंत निराशाजनक कामगिरी करून दाखवली. रोहितच्या नेतृत्वाखाली अनेकवेळा आयपीएलचे जेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सला या मोसमात चांगली कामगिरी करता आली नाही. रोहित शर्माच्या अनुपस्थितीमुळे संघाच्या नेतृत्व क्षमतेवर परिणाम झाल्याचे अमित मिश्राचे मत आहे.