फोटो सौजन्य - सोशल मीडिया
दिनेश कार्तिक सोशल मीडिया पोस्ट : भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सध्या मालिका सुरु आहे. या मालिकेत भारताचा संघ चांगली कामगिरी करत आहे. भारतीय T20 संघाचा फॉर्म चांगला चालला आहे. भारताचा संघाचा फिरकी गोलंदाज वरून चक्रवर्तीचे संघामध्ये पुनरागमन झाले आहेत. जरी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या T20 सामन्यात भारतीय संघ लहान धावसंख्येचा बचाव करू शकला नसला तरी भारतीय संघाच्या गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी केली. यात सर्वात चमकदार कामगिरी वरुण चक्रवर्तीची होती. त्याने आपल्या गोलंदाजीने दक्षिण आफ्रिकेचा अर्धा संघ पॅव्हेलियनमध्ये परत पाठवला. आता वरुणबाबत त्याला चॅम्पियन्स ट्रॉफी संघात स्थान देण्यात यावे, अशी मागणी केली जात आहे, त्यासाठी दिनेश कार्तिकनेही ट्विट केले आहे.
भारताचा माजी क्रिकेट खेळाडू दिनेश कार्तिकने सोशल मीडियावर भारतीय संघाच्या निवडकर्त्यांबाबत महत्त्वपूर्ण वक्तव्य केले आहे. 2025 मध्ये होणाऱ्या चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी मिस्ट्री स्पिनर वरुण चक्रवर्तीला संघात स्थान देण्यात यावे, असे त्याने म्हटले आहे. कार्तिकने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर एक संदेश पोस्ट केला आहे की वरुण सध्या त्याच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम फॉर्ममध्ये आहे आणि त्याची निवड न करणे ही ‘मोठी चूक’ ठरू शकते.
दिनेश कार्तिकने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे- “जर भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी वरुण चक्रवर्तीची निवड केली नाही, तर ही एक मोठी चूक असेल. तो एक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून उदयास आला आहे आणि त्याच्या कामगिरीकडे दुर्लक्ष करणे योग्य होणार नाही.”
If india don’t pick VARUN CHAKRAVARTHY for the Champions Trophy , then they are making a grave error
Outstanding Bowler he is turning out to be #INDvSA #CricketTwitter #Cricket
— DK (@DineshKarthik) November 10, 2024
बांगलादेशविरुद्धच्या T20 आंतरराष्ट्रीय मालिकेत संघासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. UAE मध्ये झालेल्या 2021 T20 विश्वचषकानंतर वरुणला संघात संधी मिळाली नाही, परंतु आयपीएल 2024 मधील त्याच्या कामगिरीने निवडकर्त्यांना त्याची निवड करण्यास भाग पाडले. आयपीएलमध्ये चक्रवर्तीने कोलकाता नाईट रायडर्ससाठी चमकदार कामगिरी करत सर्वाधिक विकेट्स घेतल्या आणि आपल्या संघाला चॅम्पियन बनवण्यात मोलाची भूमिका बजावली.
हेदेखील वाचा – Gautam Gambhir : रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कोण असणार कर्णधार? गौतम गंभीरने सांगितले स्पष्ट
भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये सुरु असलेल्या मालिकेत सध्या बरोबरी झाली आहे. भारताच्या संघाने पहिला सामना जिंकला होता आणि मालिकेत आघाडी घेतली होती. त्यानंतर दुसऱ्या सामन्यांमध्ये दक्षिण आफ्रिकेच्या संघाने सामना जिंकून मालिकेमध्ये बरोबरी साधली आहे. या दोन्ही संघामध्ये चार सामान्यांची मालिका होणार आहे. या मालिकेचा तिसरा सामना १३ नोव्हेंबर रोजी रंगणार आहे. यामध्ये जो संघ विजयी होईल त्या संघाच्या डोक्यावरून पराभवाचा डोंगर उतरेल. शेवटचा सामना १५ नोव्हेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे.