लडाखमध्ये भूकंपाचे धक्के (फोटो- istockphoto)
लडाखमध्ये जाणवले भूकंपाचे धक्के
गेल्या काही दिवसांत देशात अनेकदा भूकंपाचे धक्के
लेह-लडाखमध्ये तीव्र स्वरूपाचे धक्के
गेल्या काही दिवसांपासून भारतातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. आज पुन्हा एकदा भारताच्या केंद्र शासित प्रदेशात भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सोमवार म्हणजे आज केंद्रशासित प्रदेश असलेल्या लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. लेह- लडाखमध्ये 5.7 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.
दुपारी 11 वाजून 56 मिनिटांनी लडाखमध्ये भूकंपाचे धक्के जाणवले. लेहच्या धरतीपासून सुमारे 171 किमी खोल याचे केंद्रबिंदू असल्याचे समोर आले आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे कोणतीही वित्तहानी किंवा जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे. आज सकाळी राजधानी दिल्लीमध्ये देखील भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले आहेत.
सकाळी पावणे नऊच्या सुमारास 2.8 रिश्टर स्केलचा भूकंपाचे धक्के राजधानी दिल्लीत जाणवले आहेत. याचे केंद्र उत्तर दिलीत 5 किमी खोल असल्याचे समोर आले आहे.
भूकंप आल्यावर काय करावे?
आपले घर भूकंपविरोधी बनवण्यासाठी योग्य सल्ला घ्यावा
भिंती आणि छतामध्ये असलेल्या भेगा वेळच्या वेळी भरून घ्याव्या.
आपत्कालीन किट नेहमी तयार ठेवावे.
Japan Earthquake : जपानमध्ये पहाटे जोरदार भूकंप ; 6.2 तीव्रतेच्या धक्क्यांमुळे नागरिकांमध्ये घबराट
जपानमध्ये पहाटे जोरदार भूकंप
जपानमध्ये पहाटे जोरदार भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. या भूकंपाची (Earthquake) तीव्रता ६.२ रिश्टर स्केलवर होती. यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. जपानच्या हवामान केंद्राने दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाचे केंद्र पूर्व शिमाने प्रांतात होते. सुदैवाने यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवित वा वित्तहानी झालेल्याचे वृत्त आलेले नाही. परंतु सध्या हवामान विभाग अधिकारी आणि भूकंप अधिकारी परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
Indian Ecocnomy: २०२५ चा ऐतिहासिक शेवट! जपानला मागे सारत भारत बनली जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था
या भूकंपामुळे जपानची शिकांन्सेन बुलेट ट्रेन सेवा तात्पुरती थांबण्यात आली आहे. कोणत्याही जीवितहानीची किंवा नुकसानीचे संकेत नाहीत. परंतु काही भागांमध्ये वीजपुरवठा खंडित झाला आहे. तसेच इमारतींना किरकोळ नुकसान झाले आहे. सध्या कोणत्याही मोठ्या प्रकारच्या धोक्याचा किंवा त्सुनामीचा इशारा देण्यात आलेला नाही. सध्या जपानचे संरक्षण मंत्रालय, संभाव्य नुकसानीचे मूल्यांकन करत आहे. यासाठी हवाई तपासणी सुरु आहे. तसेच सरकारने स्थानिक अधिकारी आणि आपत्ती संस्थांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. याशिवाय नागरिकांना देखील सतर्क राहण्याचे आणि कोणतीही हालचाल जाणवल्यास आपत्ती व्यवस्थापन संस्थांना संपर्क साधण्याचे आवाहान करण्यात आले आहे. सरकार आणि आपत्ती व्यवस्थापन विभाग संपूर्ण परिस्थितीवर लक्ष्य ठेवून आहेत.






