फोटो सौजन्य - X
हार्दिक पंड्या : काल सुपर संडेमध्ये दोन सामने पार पडले. यामध्ये पहिला सामना राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये खेळवण्यात आला होता या सामन्यात बंगळुरूच्या संघाने फिल्ल सॉल्ट, विराट कोहली आणि देवदत्त पडिकल यांच्या जोरावर सामान एकतर्फी जिंकला. तर दुसरा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यामध्ये सामना पार पडला. या सामन्यांमध्ये मुंबई इंडियन्सच्या संघाने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्या घरच्या मैदानावर १२ धावांनी पराभूत केले. यावेळी मुंबई इंडियन्सचा फिरकी गोलंदाज कर्ण शर्माने त्याच्या गोलंदाजीची जादू चाहत्यांना दाखवली. कर्ण शर्माने दिल्ली कॅपिटल्सच्या तीन महत्वाच्या फलंदाजांना बाहेरचा रस्ता दाखवला आणि सामना जिंकण्यात महत्वाचे योगदान केले.
कालच्या सामन्यांमध्ये हार्दिक पंड्या संघासाठी मोठीच कामगिरी करू शकला नाही. खरंतर, जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या पहिल्या सामन्यात पंचांनी राजस्थानचे शिमरॉन हेटमायर आणि आरसीबीचे फिल साल्ट यांच्या बॅटची तपासणी केली. संध्याकाळी खेळल्या गेलेल्या सामन्यातही असेच काहीसे दिसून आले, जिथे पंचांनी मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्याच्या बॅटची तपासणी केली. तथापि, तिन्ही फलंदाजांच्या बॅट मानकांनुसार असल्याचे आढळून आले.
या तीन क्रिकेटपटूंपैकी, सर्वात आधी कसोटी लागलेले हेटमायर होते, जे १६ व्या षटकात यशस्वी जयस्वाल बाद झाल्यानंतर क्रीजवर आले होते. त्याने येथे ध्रुव जुरेलसोबत भागीदारी केली आणि त्याच्या संघाचा स्कोअरिंग रेट वाढवला. पण त्यानंतर काही वेळातच पंचांनी सामना थांबवला आणि हेटमायरची बॅट नियमांनुसार आहे की नाही हे पाहण्यासाठी त्याची बॅट तपासली. यानंतर पंचांनी आरसीबीचा सलामीवीर फिल साल्टची बॅटही तपासली.
𝘝𝘪𝘤𝘵𝘰𝘳𝘺 𝘵𝘢𝘴𝘵𝘦𝘴 𝘴𝘸𝘦𝘦𝘵𝘦𝘳 𝘸𝘩𝘦𝘯 𝘪𝘵’𝘴 𝘵𝘩𝘪𝘴 𝘤𝘭𝘰𝘴𝘦! 💙
3⃣ run-outs, high drama and #MI walk away with a thrilling win to break #DC‘s unbeaten run 👊
Scorecard ▶ https://t.co/sp4ar866UD#TATAIPL | #DCvMI | @mipaltan pic.twitter.com/q9wvt5yqoe
— IndianPremierLeague (@IPL) April 13, 2025
रोहित शर्मा आता मुंबई इंडियन्सचा कर्णधार नसेल, पण हिटमॅनला कर्णधारपदाचा खूप अनुभव आहे, त्यामुळे त्याला माहित आहे की कोणत्या वेळी कोणत्या गोलंदाजाला गोलंदाजी करायची. रोहितच्या दिल्लीविरुद्धच्या सामन्यातही असेच काहीसे दिसून आले. खरंतर, दिल्ली कॅपिटल्सला शेवटच्या १० षटकांत जिंकण्यासाठी ६४ धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळी रोहित डगआउटमध्ये बसून प्रशिक्षकासोबत काही रणनीती आखत होता.