फोटो सौजन्य – X
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ चा अंतिम सामना : भारताचा संघ सध्या इंग्लडविरुद्ध मालिका खेळत आहे. या मालिकेमध्ये टीम इंडीयाच्या फलंदाजांनी पहिल्या डावामध्ये चांगली कामगिरी केली होती. भारताच्या संघाने पहिल्या डावात 471 धावा केल्या होत्या त्यानंतर इंग्लडच्या संघाने भारताच्या या खेळीवर पाणी फेरलं आणि दुसऱ्या डावामध्ये 465 धावा केल्या. सध्या हा सामना सुरु आहे या सामन्यात कोण विजय मिळवणार की सामना अनिर्णयित राहणार हे पाहणे मनोरंजक ठरणार आहे. त्याआधी आजचा दिवस हा भारतीय क्रिकेटसाठी ऐतिहासिक आहे. भारताचा आतापर्यत असा एकमेव कर्णधार आहे ज्याने टीम इंडीयाला ३ आसीसी ट्राॅफी जिकुंन दिल्या आहेत.
चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ चा अंतिम सामना (India vs England Champions Trophy 2013 Final Highlights ) बर्मिंगहॅम येथे खेळला गेला होता, जिथे पावसामुळे सामना विस्कळीत झाला आणि त्यामुळे सामना ५०-५० षटकांचा नव्हता तर २०-२० षटकांचा होता. सामना जिंकण्यासाठी शेवटच्या षटकात १५ धावा हव्या होत्या… त्यांच्यासमोर एक फिरकी गोलंदाज होता, ज्याच्यावर संघाच्या विजय किंवा पराभवाचा संपूर्ण दबाव होता.
विजेत्या संघाच्या खेळाडूंचा आनंद पाहण्यासारखा होता, तर पराभूत संघाचे खेळाडू मान खाली घालून निराश दिसत होते. १२ वर्षांपूर्वी याच दिवशी खेळल्या गेलेल्या सामन्याबद्दल ही गोष्ट आहे… जेव्हा भारत आणि इंग्लंडचे संघ २०१३ मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळत होते. या सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडला त्यांच्याच भूमीवर हरवून चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले.
पावसानंतर सामना सुरू झाला तेव्हा इंग्लंडचा कर्णधार अॅलिस्टर कुकने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी टीम इंडियासाठी सलामीची जोडी म्हणून मैदानात उतरले.
ENG vs IND 3rd Day Match Report : पहिल्या डावातील शतकवीर फेल! असा झाला तिसऱ्या दिनाचा खेळ
रोहित ९ धावा काढून बाद झाला आणि धवन ३१ धावा काढून बाद झाला. रोहित बाद झाल्यानंतर दिनेश कार्तिक, सुरेश रैना आणि कर्णधार महेंद्रसिंग धोनी (MS Dhoni) यांना मिळून फक्त २ धावाच करता आल्या. जडेजाने विराट कोहलीसोबत ४७ धावांची भागीदारी केली. विराट ४२ धावा काढून बाद झाला, तर जडेजाने ३३ धावांची नाबाद खेळी केली आणि संघाला ७ विकेट्सच्या मोबदल्यात १२९ धावांपर्यंत पोहोचवले.
इंग्लंड १३० धावांचा पाठलाग करताना त्यांची सुरुवातही खराब झाली. कर्णधार अॅलिस्टर कुक फक्त २ धावा काढून बाद झाला. इयान बेल १३ धावा आणि जो रूट ७ धावा करून बाद झाला. संघाने सतत विकेट गमावल्या आणि ९ व्या षटकात ४६ धावांवर ४ विकेट गमावल्या.
यानंतर, इऑन मॉर्गन आणि रवी बोपारा यांच्यात ५० धावांची भागीदारी झाली आणि त्यांनी इंग्लंडला विजयाच्या जवळ आणले. संघाला आता १६ चेंडूत २० धावांची आवश्यकता होती आणि हे दोन्ही फलंदाज फॉर्ममध्ये दिसत होते. या षटकाच्या सुरुवातीला इशांत महागडा ठरला. दुसऱ्या चेंडूवर मॉर्गनने त्याला षटकार मारला आणि पुढचे सलग दोन चेंडू वाईड होते. इशांतवरील दबाव वाढला होता, या दरम्यान माही विकेटच्या मागे धावत असताना इशांतशी बोलला. जणू काही त्याने इशांतला गुरुमंत्र दिला होता.
🗓️ #OnThisDay in 2013
📍 Edgbaston, Birmingham
The @msdhoni-led #TeamIndia beat England in a thrilling final to lift the ICC Champions Trophy 🏆🥳 pic.twitter.com/U1XtpPkwcy
— BCCI (@BCCI) June 23, 2025
दोन वाईड मारल्यानंतर, इशांतने पुढच्या दोन चेंडूंवर इंग्लंडच्या सेट फलंदाजांना आपला बळी बनवले. इशांतचा पहिला बळी इऑन मॉर्गन होता, तर पुढच्याच चेंडूवर रवी बोपारा त्याच्या जाळ्यात अडकला. अश्विनने त्याचा झेल घेतला. अशाप्रकारे इशांतने २ चेंडूत सामना पूर्णपणे उलटला. टीम इंडियाच्या विजयाच्या आशा पुन्हा एकदा पल्लवीत झाल्या.
इंग्लंडला चॅम्पियन होण्यासाठी शेवटच्या चेंडूवर ६ धावांची आवश्यकता होती. यावेळी जेम्स ट्रेडवेलला अश्विनच्या हातून शेवटचा चेंडूही हात लावता आला नाही आणि अशाप्रकारे भारताने इंग्लंडचा ५ धावांनी पराभव केला आणि चॅम्पियन्स ट्रॉफीचे विजेतेपद जिंकले.
एमएस धोनी (कर्णधार/ विकेटकिपर), विराट कोहली, शिखर धवन, मुरली विजय, दिनेश कार्तिक, रोहित शर्मा, सुरेश रैना, आर अश्विन, रवींद्र जडेजा, अमित मिश्रा, इरफान पठाण, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, विनय कुमार.