रोहित शर्मा(फोटो -सोशल मीडिया)
Rohit Sharma made a big prediction : भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND VS AUS) यांच्यात तीन सामन्याची एकदिवसीय मलिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताला गमवावा लागला. या सामन्यात अष्टपैलू नितीश कुमार रेड्डीने पर्थमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध एकदिवसीय सामन्यात पदार्पण केले आहे. या सामन्यात रेड्डीला रोहित शर्माकडून त्याची एकदिवसीय पदार्पणाची कॅप देण्यात आली. रोहित शर्माकडून विश्वास व्यक्त करण्यात आला की, नितीश त्याच्या कारकिर्दीत प्रगती करत असताना “सर्व फॉरमॅटमध्ये महान” खेळाडू बनेल. त्याला कॅप नंबर २६० देत रोहित शर्माने नितीश रेड्डीच्या वृत्तीचे आणि खेळण्याच्या शैलीचे कौतुक देखील केले.
हेही वाचा : मनहास, गिलसह आणि कुलदीप यादव यांना लॉटरी; दिवाळीला मिळाली ‘गोड’ बातमी; वाचा सविस्तर
बीसीसीआयकडून शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये रोहित शर्मा म्हणाला की, “कॅप नंबर २६०, नितीश रेड्डी, या क्लबमध्ये आपले स्वागत आहे. तुमच्या कारकिर्दीची सुरुवात चांगली झाली आहे. मला ११० टक्के खात्री आहे की या वृत्तीने तुम्ही भारतीय संघात खूप पुढे जाणार.” तसेच तो पुढे म्हणाला की, “मला विश्वास आहे की तुम्ही सर्व फॉरमॅटमध्ये एक उत्तम खेळाडू व्हाल. तुम्ही तुमच्या भाषणात म्हटल्याप्रमाणे, तुम्हाला सर्वत्र खेळायचे आहे. तुम्ही तिथे असावे अशी आमच्या सर्वांना इच्छा आहे. तुम्हाला पाठिंबा देण्यासाठी आणि तुमची कारकीर्द उत्तम करण्यासाठी प्रत्येकजण तिथे असणार आहे.”
नितीश रेड्डीने त्यांच्या एकदिवसीय पदार्पणाच्या सामन्यात ११ चेंडूत नाबाद १९ धावांची खेळी केली. त्यांच्या या खेळीत दोन षटकारांचा समावेश होता. त्यानंतर त्याने २.१ षटके गोलंदाजी देखील केली. त्याने या दरम्यान १६ धावा मोजल्या. परंतु त्याला एक देखील बळी घेता आला नाही.
रविवारी पर्थ स्टेडियमवर ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यातील पहिला एकदिवसीय सामना खेळला गेला. हा सामना पावसामुळे प्रभावित झालेल्या सामन्यात भारताने २६ षटकांत ९ गडी गमावून १३६ धावाच केल्या. भारतीय संघाकडून केएल राहुलने सर्वाधिक ३८ धावांची खेळी केली.
प्रत्युत्तरातदाखल ऑस्ट्रेलियाने २१.१ षटकांत ७ गडी शिल्लक असताना सामना आपल्या नावे केला. कर्णधार मिशेल मार्शने ५२ चेंडूत नाबाद ४६ धावा काढल्या तर जोश फिलिपने ३७ धावा केल्या. ऑस्ट्रेलियन संघाने तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.