फोटो सौजन्य - सोशल मिडिया (BCCI Women)
भारत आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये काही दिवसात आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषकाला (ICC Women’s Cricket World Cup 2025) सुरुवात होणार आहे. भारतीय महिला संघाने मागील काही मालिकांमध्ये चांगली कामगिरी केली आहे, त्यामुळे आता भारताच्या संघांचे लक्ष्य विश्वचषकावर असणार आहे. भारताच्या महिला संघाची एकदिवसीय विश्वचषकासाठी जोरदार तयारी सुरू आहे. भारताच्या संघाने या स्पर्धेसाठी मागील अनेक सातत्याने सराव केला आहे.
सध्या भारतीय महिला संघाचे कॅम्पस सुरू आहेत आता भारताच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. विश्वचषक सुरू व्हायला २५ दिवस शिल्लक असताना भारताच्या संघाच्या खेळाडूला बाहेर व्हावे लागेल आहे. टीम इंडियाच्या संदर्भात ही दुःखद बातमी बीसीसीआयने स्वतः त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली आहे. भारतीय महिला संघाची विकेटकीपर यास्तिका भारतीय हिला संघ सोडावा लागला आहे. आता तिच्या जागेवर भारतीय संघामध्ये उमा चैत्री हिला भारतीय संघांमध्ये जागा मिळाली आहे.
बीसीसीआयने शेअर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या आगामी तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेसाठी आणि २०२५ मध्ये होणाऱ्या आयसीसी महिला क्रिकेट विश्वचषकासाठी #TeamIndia च्या संघात यास्तिका भाटियाच्या जागी उमा छेत्रीची निवड करण्यात आली आहे.
भारताचा संघ सध्या एकदिवसीय विश्वचषकासाठी सराव करत आहे. या सरावादरम्यान भारताच्या संघाची विकेटकीपर यास्तिका भाटिया हिला गुडघ्याला दुखापत झाल्यामुळे तिला संघाबाहेर व्हावे लागले आहे. यास्तिकाची दुखापत गंभीर असल्यामुळे तिला आगामी मालिका ऑस्ट्रेलिया आणि होणारा विश्वशकामध्दे खेळता येणार नाही. BCCI वैद्यकीय पथक यस्तिका भाटियाच्या प्रगतीवर लक्ष ठेवून आहे आणि संघ यास्तिका भाटियाला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो.
🚨 NEWS 🚨
Uma Chetry named as a replacement for Yastika Bhatia in #TeamIndia’s squad for the upcoming three-match ODI series against Australia and ICC Women’s Cricket World Cup 2025.
Details 🔽 #WomenInBlue | #CWC25 | #INDvAUS | @IDFCFIRSTBank https://t.co/dD3NBOu2Wp pic.twitter.com/rq8EnNe5EY
— BCCI Women (@BCCIWomen) September 4, 2025
हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उप कर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (विकेटकीपर), क्रांती गौड, सायली सातघरे, राधा यादव, श्री चरणी, स्नेह राणा, उमा चैत्री (विकेटकीपर)
तेजल हसबनीस, प्रेमा रावत, प्रिया मिश्रा