फोटो सौजन्य : JioHostar
ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याचे नाणेफेक : ऑस्ट्रेलिया विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यामध्ये महामुकाबल्याला सुरुवात झाली आहे. या दोन संघामध्ये सामन्याला सुरुवात झाली या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंम्बा बवुमाने नाणेफेक जिंकुन गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय आता दक्षिण आफ्रिकेच्या दिशेने वळणार की त्यांना त्याची भरपाई करायला लागणार हे पाहणे महत्वाचे ठरेल. या दोन संघामध्ये होणाऱ्या हा सामन्याकडे जगभरामधील क्रिकेट चाहत्यांचे लक्ष असणार आहे.
दक्षिण आफ्रिकेच्या संघासाठी ऑस्ट्रेलियाचे आव्हान असणार आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ जेतेपदाला डिफेंड करण्याचा प्रयत्न करेल. हा सामना दोन्ही संघासाठी फारच महत्वाचा आहे कारण हा फायनलचा सामना असणार आहे. या सामन्यामध्ये नाणेफेकचा निर्णय हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाकडे झुकला. दोन्ही संघ हे कागदावर फारच मजबुत पाहायला मिळत आहे. या दोन्ही संघाची कामगिरी या सामन्यात कशी राहिल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
रबाडाच्या कामगिरीवर चाहत्यांची नजर असणार आहे, तो आयपीएल 2025 फार काही चांगली कामगिरी करु शकला नाही. त्याचबरोबर स्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा ट्रॅव्हिस हेड कशी कामगिरी करेल हे पाहणे मनोरंजक ठरेल. उस्मान ख्वाजा आणि कगिसो रबाडा यांच्यामध्ये टक्कर पाहिली तर 14 सामन्यामध्ये 5 वेळा रबाडाने बाद केले आहे.
No voice better than #RaviShastri to kickstart the ICC #WTC25 Final! 🎙#SouthAfrica win the toss and choose to bowl first. 💪
LIVE NOW 👉 https://t.co/9lZGHcdeVP #WTCFinal | #SAvAUS, Day 1, watch LIVE on Star Sports 1, Star Sports 1 Hindi & JioHotstar pic.twitter.com/fdpH4htSpd
— Star Sports (@StarSportsIndia) June 11, 2025
एडन मार्करम, रायन रिकेल्टन, ट्रिस्टन स्टब्स, टेम्बा बावुमा (कर्णधार), डेविड बेडिंघम, काइल वेरेन (विकेटकीपर), वियान मुल्डर, मार्को येन्सन, केशव महाराज, कगिसो रबाडा, लुंगी एनगिडी|
उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव स्मिथ, ट्रॅविस हेड, कैमरन ग्रीन, ब्यू वेबस्टर, एलेक्स कॅरी (विकेट कीपर), पैट कमिंस (कर्णधार), मिचेल स्टार्क, नाथन लायन, जोश हेजलवुड|
बातमी अपडेट होत आहे…