ENxYOU कडून जर्सीच्या प्रायोजकत्वाची घोषणा(फोटो-सोशल मीडिया)
मुंबई : TENxYOU ने प्रतिष्ठित हॅरिस शील्ड स्पर्धेत भाग घेणाऱ्या अव्वल आठ संघांसाठी क्रिकेट जर्सीच्या प्रायोजकत्वाची आज घोषणा केली. तळागाळातील क्रिकेट प्रतिभेचे पोषण करण्याच्या आणि पुढील पिढीच्या चॅम्पियन्सना पाठिंबा देण्याच्या TENxYOU च्या वचनबद्धतेवर ही भागीदारी जोर देते.
भारतातील सर्वात जुन्या शालेय-स्तरीय क्रिकेट स्पर्धांपैकी एक असलेली हॅरिस शील्ड स्पर्धेचे हे १२९ वे वर्ष आहे. ही स्पर्धा क्रिकेटमधील असंख्य दिग्गजांसाठी एक सुरुवातीचा महत्त्वपूर्ण टप्पा ठरली आहे. गेल्या काही वर्षांमध्ये, या स्पर्धेने सचिन तेंडुलकर, विनोद कांबळी, वसीम जाफर आणि रोहित शर्मा यांच्यासह अनेक जागतिक दर्जाचे क्रिकेटपटू दिले आहेत. आपल्या समृद्ध वारसा आणि स्पर्धात्मक भावनेसाठी ओळखली जाणारी ही स्पर्धा भारतातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंच्या कारकिर्दीला आकार देण्यात महत्त्वाची भूमिका बजावत आहे. दरवर्षी शेकडो शाळा यात भाग घेतात, हॅरिस शील्ड ही केवळ एक स्पर्धा नाही—तर प्रतिभा, चिकाटी, आणि क्रिकेटच्या भावनेचा गौरव करणारी एक ती परंपरा आहे.
यावेळी बोलताना, क्रिकेट आयकॉन, TENxYOU चे सह-संस्थापक आणि चीफ इन्सपिरेशन ऑफिसर सचिन तेंडुलकर म्हणाले, “हॅरिस शील्डचे माझ्या मनात खूप खास स्थान आहे. त्या सामन्यांनी मला शिस्त, टीमवर्क आणि लवचिकता शिकवली—हे गुण माझ्या संपूर्ण कारकिर्दीत माझ्यासोबत राहिले. या स्पर्धेला पाठिंबा देण्याने युवा खेळाडूंना तोच मंच प्राप्त होईल, ज्याने माझ्या प्रवासाला आकार दिला.”
TENxYOU चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक कार्तिक गुरुमूर्ती यांनी पुढे सांगितले की, “TENxYOU मध्ये, युवा प्रतिभेला लहान वयातच ओळखणे आणि त्यांना उज्ज्वल भविष्य निर्माण करण्यासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पुरवणे यावर आमचा विश्वास आहे—असे भविष्य जिथे भारताचे खेळणे कधीच थांबणार नाही. हे प्रायोजकत्व केवळ जर्सी पुरवण्यापेक्षा अधिक आहे. हे युवा खेळाडूंना सक्षम बनवणे, त्यांच्या स्वप्नांना प्रोत्साहन देणे आणि भारतीय क्रिकेटसाठी एक मजबूत पाया तयार करणे आहे.”
भविष्यादेखील TENxYOU खेळाडूंना उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी सर्वोत्तम उपकरणे आणि संसाधने पुरवून तळागाळातील स्तरावर आपला सहभाग अधिक वाढवण्याची योजना आखत आहे. उच्च-गुणवत्तेच्या स्पोर्ट्स किटपासून ते प्रगत प्रशिक्षणाच्या सोयीपर्यंत सर्व देताना, या ब्रँडचे उद्दिष्ट आहे की प्रत्येक महत्त्वाकांक्षी क्रिकेटपटूला त्यांच्या पार्श्वभूमीची पर्वा न करता, भविष्य घडवण्याची संधी मिळेल याची खात्री करणे. TENxYOU ची संकल्पना अशी आहे की एक अशी क्रीडा परिसंस्था तयार करणे जिथे प्रतिभेला संधी मिळेल आणि भारतात जगाला प्रेरणादायी चॅम्पियन तयार होतच राहतील. हॅरिस शील्डसारख्या शालेय-स्तरीय स्पर्धांमध्ये गुंतवणूक करून, TENxYOU अशा भविष्याचा पाया रचत आहे जिथे क्रिकेट हा पुढील पिढ्यांसाठी अभिमान आणि उत्साहाचा स्रोत राहील.
हेही वाचा : Ashes series 2025 : अबब! मोठा अपघात टळला! कॅच घेताना दोन खेळाडूंची टक्कर; पहा VIDEO
अशा सहयोगांमधून खेळाडूंच्या चांगल्या भविष्याकडे बघण्याचा TENxYOU चा सर्वांगीण दृष्टिकोन स्पष्ट होतो—ज्यामध्ये परफॉर्मन्स, कम्फर्ट आणि विज्ञानाच्या आधारावर विकसित केलेली नावीन्यता एकत्र आणली आहे. TENxYOU च्या इनसाईट नावाच्या खास बायोमेकॅनिक्स तंत्रज्ञानाचा उपयोग करून, या ब्रँडने आर्च-फिटेड इनसोल्स तयार केले आहेत. हे इनसोल्स खेळाडूंचा कम्फर्ट वाढवण्यासाठी, दुखापतीचा धोका कमी करण्यासाठी आणि युवा क्रिकेटपटूंच्या शारीरिक विकासाला आधार देण्यासाठी बनवले आहेत.






