फातिमा सनाला झाले अश्रू अनावर (फोटो- ट्विटर)
काल पाकिस्तान महिला संघाचा साऊथ आफ्रिका महिला संघाने दारुण पराभव केला. यामुळे पाकिस्तानला सलग दुसरा सामना गमवावा लागला आहे. सामना जिंकण्याच्या जवळ असताना झालेला प्रभाव फातिमा सनाला सहन झाला नाही. त्यामुळे ती मैदानावर भावुक झाल्याचे दिसून आले. तिचा एक फोटो देखील व्हायरल झाला आहे.
Fatima Sana has shown great heart and leadership, but she can’t win alone. For Pakistan Women to succeed on the world stage, the entire squad must step up and deliver match-winning performances. Team effort is the only way forward. 😔 pic.twitter.com/RbaCRM9mqm — Parvez Ali (@real_parvezali) June 18, 2026
कालच्या सामन्यात पाकिस्तानला विजय मिळवून देण्यासाठी कर्णधार फातीमा सनाने शानदार अर्धशतकी खेळी केली होती. मात्र तिची खेळी व्यर्थ गेली. तिची शानदार खेळी पाकिस्तानला विजय मिळवून देऊ शकली नाही. त्यामुळे तिच्या अश्रूंचा बांध फुटला. डग आउटमध्ये ती भावुक झाल्याचे दिसून आले.
RSA W Vs PAK W Live: लाजच निघाली! पाकिस्तानचे लवकरच ‘पॅकअप’? आफ्रिकेचा 2 विकेट्सने विजय
पाकिस्तानचे लवकरच ‘पॅकअप’?
आयसीसी महिला टी 20 वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तान महिला संघ आणि साऊथ आफ्रिकेचा संघ आमनेसामने आले अहोते. पाकिस्तानच्या दृष्टीने सामना हा महत्वाचा समजला जात होता. मात्र या महत्वाच्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा दारुण पराभव केला आहे. त्यामुळे पाकिस्तानचा या स्पर्धेतील सलग दुसरा पराभव झाला आहे. दक्षिण आफ्रिकेने 2 विकेट्सने विजय प्राप्त केला आहे. इंग्लंडमध्ये सुरू असलेल्या आयसीसी महिला टी-२० वर्ल्ड कप २०२६ स्पर्धेत कमालीचा थरार पाहायला मिळत आहे. या स्पर्धेत पाकिस्तानच्या संघाला सलग दुसरा पराभव स्वीकारावा लागला आहे. एजबॅस्टन येथे झालेल्या ग्रुप-ए मधील दुसऱ्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानवर २ विकेट्सने थरारक विजय मिळवला आहे.
गरीबी मे आटा गिला! Pakistan चा पार कचरा; टीम इंडियाचे दोन विजय अन्…, सध्या स्थिती काय?
पाकिस्तानच्या संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी केली. मात्र त्यांचा तो निर्णय चुकीचा ठरला. कारण पाकिस्तानने 9 विकेट्स गमावून केवळ 126 रन्स केल्या. कर्णधार फातीमा सनाच्या अर्धशतकी खेळीमुळे पाकिस्तान संघाने 126 रन्सपर्यन्त मजल मारली. साऊथ आफ्रिकेकडून मारिझान कॅपने ३ विकेट्स घेतल्या. 127 रन्सचे आव्हान दक्षिण आफ्रिकेसाठी सोपे होते. मात्र त्यासाठी त्यांना 17 ओव्हरपर्यंत वाट पहावी लागली. तसेच पाकिस्तानने बहडक गोलंदाजी करत आफ्रिकेच्या 8 फलंदाजांना आउट केले. आफ्रिकेकडून अॅनेरी डेर्कसनने अर्धशतकी म्हणजेच विजयी खेळी केली. कर्णधार फातीमा सनाने 3 विकेट्स घेतल्या. मात्र तिला विजय मिळवता आला नाही.






