फोटो सौजन्य : The Khel India
पॅरिस डायमंड लीग २०२५ : पॅरिस डायमंड लीग २०२५ ही स्पर्धा काल मध्यरात्री पार पडली यामध्ये भारताचा गोल्डन बाॅय निरज चोप्रा याने आणखी एकदा कमाल केली आहे आणि भारताच्या संघाचा झेंडा पॅरिसमध्ये फडकवला आहे. पॅरिस डायमंड लीग २०२५ मध्ये भारतीय भालाफेकपटू नीरज चोप्राची चमक पाहायला मिळाली. शुक्रवारी पॅरिसमधील स्टेड सेबॅस्टियन चार्लेटी स्टेडियमवर हा सामना खेळला गेला. ज्यामध्ये नीरज चोप्राने जर्मनीच्या ज्युलियन वेबरला हरवून सुवर्णपदक जिंकले. यापूर्वी नीरज चोप्राला डायमंड लीगमध्ये दोनदा ज्युलियन वेबरकडून पराभव पत्करावा लागला होता, परंतु यावेळी त्याने विजय मिळवला आहे.
नीरज चोप्राने पहिल्या फेक्यात ८८.१६ मीटरपर्यंत भालाफेक केली आणि पहिल्या फेक्यातच तो सर्वांपेक्षा पुढे होता. त्याची आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली, ज्यामुळे तो विजेता ठरला. दुसऱ्या थ्रोमध्ये नीरजने ८५.१० मीटरपर्यंत भालाफेक केली आणि त्यानंतर त्याचा तिसरा आणि चौथा फेका फाऊल झाला. त्यानंतर नीरजने सहाव्या प्रयत्नात ८२.८९ मीटरपर्यंत भालाफेक केली.
दुसरीकडे, जर्मनीच्या ज्युलियन वेबरने पहिल्या प्रयत्नात ८७.८८ मीटरपर्यंत भालाफेक केली आणि नीरजच्या जवळ पोहोचला. त्यानंतर, वेबरने दुसऱ्या फेरीत ८६.२० मीटरपर्यंत भालाफेक केली. दुसरीकडे, ब्राझीलच्या मॉरिसियो लुईझने तिसऱ्या फेरीत ८६.६२ मीटरपर्यंत भालाफेक केली. ज्यामुळे तो तिसऱ्या स्थानावर राहिला.
NEERAJ CHOPRA 🇮🇳PARIS DL💎
🚀With Massive 1st Attempt Throw of 88.16 Lieutenant Colonel Neeraj Chopra claimed Top Spot in Paris !!
His 6 Throws were !
88.16,85.10,X,X,X,82.89 !!👉🏻 Maintained his Top 2 Streak since Tokyo Olympics still !!
🇮🇳🇮🇳🚀🙌🏻#ParisDL pic.twitter.com/YGWvWHsBhP
— Navin Mittal (@NavinSports) June 20, 2025
यापूर्वी, १६ मे रोजी झालेल्या दोहा डायमंड लीगमध्ये ज्युलियन वेबरने नीरज चोप्राचा पराभव केला होता. या सामन्यात ज्युलियनने शेवटच्या फेकमध्ये ९१.०६ मीटरपर्यंत भालाफेक करून पहिले स्थान मिळवले. याशिवाय, नीरज चोप्रा ९०.२३ मीटरपर्यंत भालाफेक करू शकला. ज्यामुळे नीरजला दुसऱ्या स्थानावर राहावे लागले, जरी हा नीरजचा आतापर्यंतचा सर्वोत्तम फेक होता. आता नीरज चोप्रा ५ जुलैपासून होणाऱ्या एनसी क्लासिकच्या पहिल्या आवृत्तीत सहभागी होईल.
2024 मध्ये झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये निरजने सिल्वर मेडल नावावर केले होते. मागील 7-8 वर्षामध्ये भारतीय स्पोर्ट्स साठी निरज चोप्राने कमालीची कामगिरी केली आहे. त्याने त्याच्या खेळी भारताच्या अनेक युवा पिढीला त्याने प्रोत्साहन दिले आहे.