PSL 2025 : पाकिस्तानात PSL 2025 स्पर्धेला गालबोट! पहिल्या सामन्यापूर्वीच इस्लामाबादच्या टीम हॉटेलमध्ये अग्नीतांडव(फोटो-सोशल मीडिया)
PSL 2025 : पाकिस्तान सुपर लीग २०२५ ची सुरुवात काल शुक्रवार, ११ एप्रिल रोजी झाली आहे. काल पहिला सामना इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर्स यांच्यात खेळवण्यात आला. रावळपिंडी क्रिकेट स्टेडियमवर हा सामना पार पडला. इस्लामाबादने लाहोर कलंदर्सचा पराभव केला. मात्र, पीएसएल सुरू होण्यापूर्वीच या स्पर्धेला गालबोट लागले. पाकिस्तानातील इस्लामाबादमध्ये एक मोठा अपघात घडला. इस्लामाबादमधील टीम हॉटेलमध्ये आग लागल्याची माहिती मिळत आहे. जिथे पीएसएलचे खेळाडू, अधिकारी आणि लीगशी संबंधित इतर सदस्य देखील वास्तव्यास होते.
हेही वाचा : CSK vs KKR: लाईव्ह शोमध्ये वीरेंद्र सेहवाग पुन्हा चर्चेत! CSK च्या जखमांवर तिखटाचा मारा.. पहा VIDEO
हॉटेलच्या सहाव्या मजल्यावर ही दुर्घटना घडली होती. जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले की, आग वरच्या मजल्यावर लागली आणि अग्निशमन दल तत्काल घटनास्थळी हजर होऊन त्यांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. यामध्ये दिलासादायक बाब अशी की, या आगीमुळे कोणत्याही खेळाडूला किंवा अधिकाऱ्याला कोणत्याही प्रकारची दुखापत झालेली नाही, अथवा कुठला त्रास देखील झालेला नाही. सर्वांना सुरक्षितरित्या बाहेर काढण्यात आले.
पीएसएलचे सीईओ असलेल्या सलमान नसीर यांनी सांगितले की ‘कोणत्याही खेळाडूला किंवा संघातील इतर कुणाला देखील कुठल्याच प्रकारची समस्या जाणवली नाही. आगीवर वेळेवर नियंत्रण मिळवण्यात आले. आग हॉटेलमध्ये पासरण्यापसून रोखण्यात आले.’ तसेच ते पुढे म्हणाले की, ‘अग्निशमन दलाच्या पथकांकडून आग विझवण्यासाठी ताबोडतोब प्रयत्न करण्यात येऊन, आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले.’
हॉटेलमध्ये लागलेली आग, अग्निशमन दलाकडून अवघ्या अर्ध्या तासात विझवण्यात आली आहे. सीडीएचे आपत्कालीन संचालक जफर इक्बाल यांनी दिलेल्या माहितीत त्यांनी म्हटले आहे की, ‘बचाव कार्यात सहा अग्निशमन इंजिन आणि ५० अग्निशमन दलाच्या जवानांनी सहभाग भाग घेतला होता. त्यांच्या कठोर मेहनतीने अर्ध्या तासात आग विझवण्यात यश आले.’
हेही वाचा : IPL 2025 : दिल्लीच्या वादळाचे थैमान, ट्रेंट बोल्टला मैदान सोडून काढावा लागला पळ, ओरडत म्हणाला.. पहा Video
पाकिस्तानातील पीएसएल २०२५ चा पहिला सामना , इस्लामाबाद युनायटेड आणि लाहोर कलंदर्स यांच्यात खेळवण्यात आला. या पहिल्या सामन्यात, इस्लामाबाद युनायटेडकडून नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत प्रथम फलंदाजी करणाऱ्या लाहोर कलंदर्सचा संघ १९.२ षटकांत सर्वबाद १३९ धावाच करू शकला. इस्लामाबादने युनायटेड संघाने हे लक्ष्य केवळ १७.४ षटकांमध्येच पूर्ण करून पीएसएल २०२५ स्पर्धेतील सलामीचा सामाना आपल्या नावे केला.