फोटो सौजन्य - मीडिया
बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन : भारतीय स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेन त्याच्या दमदार फॉर्ममध्ये पाहायला मिळत आहे. त्याने ग्रुप स्टेज स्टेजच्या सामन्यात जागतिक क्रमवारीमध्ये तिसऱ्या स्थानावर असलेल्या जोनाथन क्रिस्टीला पराभूत करून राउंड ऑफ १६ मध्ये एंट्री केली होती. त्यानंतर राऊंड ऑफ १६ च्या सामन्यात त्याचा सामना भारताचा अनुभवी बॅडमिंटनपटू एचएस प्रणॉय त्याच्यासोबत झाला. या सामन्यामध्ये त्याने सलग दोन्ही गेम जिंकून क्वाटर फायनल गाठली होती. आता त्याने २ ऑगस्ट रोजी झालेल्या सेमीफायनलमध्ये सुद्धा अशीच काही आश्चर्यकारक कामगिरी करून सेमीफायनल गाठली आहे. चायनीज तैपेई चाऊ टीन चेनचा २-१ चा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे.
परिस ऑलिम्पिकमधील लक्ष्यच्या कामगिरीवर नजर टाकली तर त्याने या स्पर्धेमध्ये एकही सामना गमावता सेमी फायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारताने बॅडमिंटन सिंगल्समध्ये खेळणारे दोन प्लेयर्स पाठवण्यात आले होते. त्याचबरोबर एक दुहेरी जोडी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी आणि महिला वैयक्तिक स्पर्धेमध्ये पी व्ही सिंधू आणि महिला दुहेरी जोडी अशी बॅडमिंटनसाठी भारताने तुकडी पाठवली होती. परंतु भारताच्या महिला आणि पुरुष दुहेरी जोड्या, पीव्ही सिंधू यांना पराभवाचा सामना करावा लागला आहे आणि त्यामुळे आता या पॅरिस ऑलिम्पिकच्या बॅडमिंटन स्पर्धेमध्ये लक्ष्य सेन,कडूनच भारतीयांना आशा आहेत.
कॉटर फायनल सामन्यांमध्ये भारतीय बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनचा सामना चायनीज तैपेई चाऊ टीन चेन विरुद्ध झाला. लक्ष्य सेनने या सामन्यामध्ये १९-२१, १५-२१, १२-२१ असा खेळ जिंकून दणक्यात सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. लक्ष्य सेन ऑलिम्पिकमध्ये पहिल्यांदा सहभागी झाला आहे. या स्पर्धेमध्ये त्याने पहिल्यांदा तीन सेटचा खेळ खेळला. याआधी सामान्यांमध्ये भारताच्या लक्ष्य सेनने सलग सेट जिंकून सामने जिंकले आहेत.
भारताचा स्टार शटलर लक्ष्य सेन आता सेमी फायनलचा सामना ४ ऑगस्ट रोजी खेळणार आहे. यामध्ये तो डेन्मार्कच्या व्हिक्टर ऍक्सेलसन याचे आव्हान असणार आहे. व्हिक्टर ऍक्सेलसन हा सध्या जागतिक क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानावर आहे. त्यामुळे लक्ष्य समोर व्हिक्टर ऍक्सेलसनचे मोठे आव्हान असणार आहे.