ST चा प्रवासाच्या सवलतीसाठी 'NCMC' कार्ड अनिवार्य; बोगसगिरीला बसणार चाप
Maharashtra Politics: राजकारणात भूकंप होणार? राज ठाकरे-एकनाथ शिंदेंच्या भेटीला, बंधू नाराज?
प्रमुख बसस्थानकांवर नोंदणी केंद्र
कोकणासह राज्यातील सर्व आगारांमध्ये विशेष नोंदणी मोहिम राबवण्यात येणार आहे. प्रमुख बसस्थानकांवर नोंदणी केंद्र उभारण्यात येतील. ज्येष्ठ नागरिक आणि महिलांसाठी स्वतंत्र सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती एसटी प्रशासनाने दिली आहे. या उपक्रमामुळे सवलतींची अचूक नोंद ठेवणे, गैरवापर टाळणे आणि प्रवाशांना अधिक सुरक्षित व स्मार्ट प्रवासाची सुविधा देणे शक्य होणार असल्याचा दावा महामंडळाकडून करण्यात आला आहे.
१९९ रुपयांत नवीन कार्ड
नवीन एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपये शुल्क आकारले जाणार आहे. कार्ड हरवल्यास किंवा पुन्हा काढायचे असल्यास १४९ रुपये मोजावे लागतील. कार्डमध्ये ५० रुपयांच्या पटीत रक्कम भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार असून, अधिकृत काउंटर, ईटीएम मशिन तसेच मोबाईल अॅपद्वारे रिचार्जची सोय केली जाणार आहे.
IIT मुंबईत लेक्चर सुरु असतानाच डोगेश भाईची रुबाबात एन्ट्री; VIDEO तुफान व्हायरल
सवलतधारकांसाठी आवश्यक कागदपत्रे
विद्यार्थ्यांना त्यांच्या शैक्षणिक क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
ज्येष्ठ नागरिक व महिलांना आधार क्रमांकाशी संलग्न कार्ड मिळेल.
दिव्यांग प्रवाशांना यूडीआयडी क्रमांकाशी जोडलेले कार्ड दिले जाईल.
पुरस्कार विजेत्यांना विभागीय कार्यालयामार्फत विशेष कार्ड वितरित केले जाईल.






