कल्याण : कल्याण शहरात प्राथमच (Kalyan) आमदार चषक – बुद्धिबळ स्पर्धेचे (MLA Cup – Chess Tournament) आयोजन करण्यात आले असून ही स्पर्धा १६ एप्रिल रोजी कल्याणातील नवरंग हॉल (Navrang Hall) येथे पार पडणार आहे. आयोजित स्पर्धेत सहाभागी आणि विजेत्या स्पर्धकांना २ लाखांचे परितोषिक (2 Lakh Prize To The Winning Contestants) देण्यात येणार आहे. तर प्रथम परितोषिक दुचाकी आकर्षण असणार आहे. विशेष म्हणजे ग्रँड मास्टर आर आर लक्ष्मण या स्पर्धेत सहभागी होणार आहेत (Grand Master RR Laxman will participate in this competition).
कल्याण तालुका बुद्धिबळ संस्था आणि आमदार विश्वनाथ भोईर (MLA Vishwanath Bhoir) यांच्या संयुक्त विद्यमानाने आमदार चषक – ऑल इंडिया ओपन रँपिंड रेटींग चेस चॅम्पियनशीप स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा आज (रविवारी १६ एप्रिल) रोजी कल्याण पश्चिमेतील नवरंग बंक्वेट हॉल येथे पार पडणार आहे. या स्पर्धेला देशातून १७ राज्यातून जवळपास ५५० ते ६०० विद्यार्थी येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली असून आतापर्यंत ५०० विद्यार्थ्यांची ऑनलाइन नोंद झाली आहे. तर यात कल्याण डोंबिवलीतील २०० विद्यार्थी आहेत.
[read_also content=”मेट्रो कारशेड कांजूरमार्गला हलवत मुंबईकरांवर अतिरिक्त खर्च आणि प्रकल्पाला विलंब करणाऱ्या ठाकरे पितापुत्रांनी माफी मागावी : केशव उपाध्ये यांचा आरोप https://www.navarashtra.com/maharashtra/thackeray-father-and-son-should-apologize-for-shifting-metro-carshed-to-kanjur-marg-causing-additional-cost-to-mumbaikars-and-delaying-the-project-keshav-upadhye-nrvb-385534.html”]
कल्याण मध्ये प्रथमच बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. कल्याण तसेच देशातील बुद्धिबळ पट्टूना व्यासपीठ उपलब्ध व्हावे या हेतून स्पधेचे आयोजन करण्यात आले. आतापर्यंत ५०० जणांची नोंदणी आली आहे. बुद्धिबळ खेळण्याची इच्छा असून देखील स्पर्धेची नोंदणी फी भरू शकत नसलेल्या विद्यार्थ्यांनी आमदार विश्वनाथ भोईर यांच्याशी संपर्क साधावा त्यांची फी भरण्यात येवून स्पर्धेत प्रवेश मिळवून देवू. तसेच जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आमदार विश्वनाथ भोईर यांनी केले आहे. यावेळी स्पर्धेचे संचालक संजय पाटील, प्रमोशन इन्चार्ज सहर्ष सोमण, चेस लीडर टीम कोओरडीनेटर मोहित लढे, गौरव राय, माजी नगरसेवक मोहन उगले, प्रभुनाथ भोईर, जयवंत भोईर, परिवहन सदस्य सुनील खारुक आदी जण उपस्थित होते.
[read_also content=”आजचे राशीभविष्य : १६ एप्रिल २०२३, कसा जाईल आजचा दिवस वाचा सविस्तर https://www.navarashtra.com/web-stories/daily-horoscope-16-april-2023-rashibhavishya-in-marathi/”]