सुरेश रैना (फोटो- ians)
इंडियन प्रीमियर लीग मधील ‘इम्पॅक्ट प्लेयर’ या नियमावरून पुन्हा एकदा क्रिकेट वर्तुळात चर्चा रंगली आहे. भारताचा माजी स्फोटक फलंदाज सुरेश रैना याने या नियमाबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले असून, या नियमामुळे संघांना फलंदाजीत अधिक खोली मिळाली आहे. त्यामुळेच आयपीएलमध्ये आता २५० हून अधिक धावांचे मोठे लक्ष्यही सहज गाठले जात असल्याचे त्याने सांगितले.
‘करामती’ Rashid Khan चा धमाका! Suresh Raina चा ‘हा’ रेकॉर्ड उद्ध्वस्त, आयपीएलमध्ये रचला नवा इतिहास
सुरेश रैनाच्या मते, या नियमामुळे मैदानावरील फलंदाजांचे विकेट गमावण्याचे दडपण कमालीचे कमी झाले आहे. जर सुरुवातीच्या ओव्हर्समध्ये झटपट विकेट्स पडल्या, तरीही संघ गरज पडल्यास एका अतिरिक्त तज्ज्ञ फलंदाजाला मैदानावर खेळवू शकतात. फलंदाजीत मिळालेल्या या पर्यायामुळे संघ पहिल्या ओव्हरपासून आक्रमक फलंदाजी करण्याचा मार्ग स्वीकारत असल्याचे दिसून येत आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गज खेळाडूंनी देखील या नियामावर भाष्य केल्याचे समोर आले होते. तसेच आता सुरेश रैनाच्या या वक्तव्यानंतर आयपीएलच्या आगामी हंगामात या नियमाबाबत बीसीसीआय काय निर्णय घेणार, याकडे क्रीडाप्रेमींचे लक्ष लागले आहे.
जर धोनीने मेंटॉर किंवा कोच म्हणून जबाबदारी स्वीकारली, तर गौतम गंभीरने कोलकाता नाइट रायडर्ससाठी किंवा सचिन तेंडुलकरने मुंबई इंडियन्ससाठी बजावलेल्या भूमिकेप्रमाणेच धोनी सीएसकेच्या थिंक टँकचा मुख्य चेहरा बनेल.धोनीने अजूनही अधिकृत निवृत्ती जाहीर केलेली नसल्यामुळे, त्याच्या कोट्यवधी चाहत्यांना सीएसकेकडून अधिकृत घोषणेची प्रतीक्षा आहे. आयपीएल २०२७ च्या लिलावापूर्वी चेन्नई सुपर किंग्स आणि एमएस धोनी काय निर्णय घेतात, याकडे संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष लागले आहे.






