गौतम गंभीर : इंडियन प्रीमियर लीगला (Indian Premier League 2024) भारतामध्येच नाही तर जगभरामध्ये लोक पसंत करतात. त्याचबरोबर भारतातील आणि जगामधील क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी त्यांना व्यासपीठ देण्यात आले आहे. परंतु यासंदर्भात तरुणांसाठी गौतम गंभीरने (Gautam Gambhir ) वक्तव्य केले आहे. ही लीग भारतीय तरुणांना भारतीय संघात सामील होण्यासाठी ‘शॉर्टकट’ माध्यम बनणार नाही, अशी आशाही गंभीरने व्यक्त केलीय आहे. संध्या गौतम गंभीर आयपीएल २०२४ मध्ये केकेआरचा मेंटर आहे. परंतु त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रशिक्षणाचा अनुभव नाही. बीसीसीआयने गंभीरशी संपर्क साधला असून तो टीम इंडियाचा प्रशिक्षक बनण्यास इच्छुक आहे की नाही या संदर्भात अजुनपर्यत कोणतीही माहिती त्याने दिली नाही.
[read_also content=”क्वालिफायर 1 मध्ये कोण मारणार बाजी? कोलकाता आणि हैदराबाद आमनेसामने https://www.navarashtra.com/sports/who-will-beat-baji-in-qualifier-1-kolkata-knight-riders-vs-sunrisers-hyderabad-536041.html”]
भारताचा अनुभवी फिरकीपटू रविचंद्रन अश्विनच्या यूट्यूब कार्यक्रम ‘कुट्टी स्टोरीज विथ ॲश’ या युट्युब चॅनेलवर गौतम गंभीरने संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, माझ्यासाठी सर्वात मोठी चिंता ही आहे की किती तरुण भारतासाठी कसोटी क्रिकेट खेळू इच्छितात. मला आशा आहे की आयपीएल हा भारतासाठी खेळण्याचा शॉर्टकट ठरणार नाही. कोलकाता नाईट रायडर्सच्या मार्गदर्शकाने मान्य केले की भारतीय क्रिकेटपटूंना आयपीएलचा फायदा झाला आहे. आजच्या युगात, जेव्हा मी आंतरराष्ट्रीय T-20 संघ पाहतो आणि जेव्हा भारताविरुद्ध खेळण्याचा विचार केला जातो तेव्हा दोन-तीन संघांव्यतिरिक्त मला फारशी स्पर्धा दिसत नाही असे गौतम गंभीर म्हणाला.
पुढे गौतम गंभीर म्हणाला की, अनेक संघ भारताच्या ताकदीची बरोबरी करू शकत नाहीत. त्यामुळे मला वाटते की आज आयपीएल आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटपेक्षा खूपच स्पर्धात्मक बनले आहे. आमच्या देशांतर्गत खेळाडूंची पातळी वाढली आहे. त्याला ज्या प्रकारे आयपीएल खेळायचे आहे, टी-20 क्रिकेटसाठी तो ज्या प्रकारे तयारी करतो, मला वाटते की त्याचे लक्ष टी-20 क्रिकेट खेळण्यावर जास्त आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरने आयपीएलच्या या मोसमात प्लेऑफमध्ये प्रवेश केला आहे.