फोटो सौजन्य - Neeraj Chopra (X)
पॅरिस डायमंड लीग 2025 : आजपासून भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेला सुरुवात होणार आहे. रोहित शर्माच्या निवृत्तीनंतर भारतीय संघाचे नेतृत्व शुभमन गिल करताना दिसणार आहे. त्याचबरोबर या मालिकेसाठी क्रिकेट चाहते देखील फार उत्सुक आहेत कारण की नव्या खेळाडूंसह नव्या युगाला भारतीय संघ सुरुवात करणार आहे. याच दरम्यान भारताचा गोल्डन बॉल नीरज चोप्रा हा आज ॲक्शनमध्ये दिसणार आहे. पॅरिस डायमंड लीगला आजपासून सुरुवात होणार आहे. या स्पर्धेची लाईव्ह स्ट्रिमिंग प्रेक्षकांना कधी आणि कुठे पाहायला मिळणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
नीरज चोप्रा आज पॅरिस डायमंड लीगमध्ये सामील होताना दिसणार आहे. हि स्पर्धा भारतीय वेळेनुसार २० जूनच्या मध्यरात्री पहायला मिळणार आहे. २० जून रोजी ही स्पर्धा भारतीय वेळेनुसार १.१२ मिनिटांनी मध्यरात्री सुरू होणार आहे.
पॅरिस डायमंड लीगचे टेलिव्हिजनवर प्रक्षेपण होणार नाही. युनायटेड किंगडम येथे स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग बीबीसी आयप्लेअर आणि रेड बटण यावर पहायला मिळणार आहे. तर भारतीय प्रेक्षकांसाठी या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग ही यूट्यूब चॅनेलवर पाहायला मिळणार आहे. या स्पर्धेचे लाईव्ह स्ट्रीमिंग वंदा डायमंड येथे होणार आहे. युनायटेड स्टेट येते या स्पर्धेची लाईव्ह स्ट्रीमिंग सुपरस्पोर्ट यावर पहायला मिळणार आहे.
🚨 Neeraj Chopra at Paris Diamond League 💎
🗓️ Friday, 20th June (Midnight)
⏰ 01:12 AM IST pic.twitter.com/djvtDDod1d— The Khel India (@TheKhelIndia) June 17, 2025
नीरज चोप्रा हा भारतीयांसाठी सर्वात मोठा स्टार मानला जातो. त्याने ऑलिंपिकमध्ये २ मेडल नावावर केले आहेत. मागील स्पर्धा त्याने २३ मे रोजी चोरझो येथील जानुस कुसोसिन्स्की मेमोरियलमध्ये सहभागी झाला होता. या स्पर्धेमध्ये तो दुसऱ्या स्थानावर राहिला होता त्याने ८४.१४ मीटर भाला फेकून दुसरे स्थान पटकावले होते. जर्मनीचा वेबर येथेही पहिल्या स्थानावर होता.