Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Hardik – Surya: ‘दोस्त दोस्त ना रहा…’, हार्दिक – सूर्याच्या मैत्रीत दरार! मैत्रीचं नातं संपुष्टात? सोशल मीडियावर केले Unfollow

भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यातील मतभेद आता सार्वजनिक झाले आहेत. या दोन्ही खेळाडूंनी इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.

  • By दिपाली नाफडे
Updated On: Jun 09, 2026 | 12:17 PM
हार्दिक आणि सूर्यकुमारच्या मैत्रीत वितुष्ट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

हार्दिक आणि सूर्यकुमारच्या मैत्रीत वितुष्ट (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)

Follow Us
Follow Us:
  • हार्दिक आणि सूर्याच्या मैत्रीत दरार
  • सोशल मीडियावर केले एकमेकांना अनफॉलो
  • भारतीय टीम आणि मुंबई इंडियन्समधून एकत्र खेळणाऱ्या या दोघांना नक्की काय झाले? 
भारतीय क्रिकेट संघाचे स्टार खेळाडू सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्या यांच्यातील मतभेद आता सर्वश्रुत झाले आहेत. दोन्ही खेळाडूंनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. सूर्या आणि हार्दिक हे टीम इंडिया आणि मुंबई इंडियन्ससाठी दीर्घकाळ संघसहकारी होते, पण आता त्यांची मैत्री संपुष्टात आली आहे. इतकेच नाही, तर सूर्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून मुंबई इंडियन्सशी संबंधित सर्व पोस्ट्स देखील काढून टाकल्या आहेत, ज्यामुळे सूर्यकुमार पुढील हंगामात मुंबईकडून खेळणार नाही, अशी अटकळ बांधली जात आहे. 

मुंबई इंडियन्सला उतरती कळा 

पाच वेळा चॅम्पियन ठरलेल्या मुंबई इंडियन्सची नुकत्याच संपलेल्या इंडियन प्रीमियर लीग २०२६ मध्ये निराशाजनक कामगिरी झाली होती. हार्दिक पांड्याच्या कर्णधारपदाखाली सलग दुसऱ्यांदा संघ प्लेऑफमध्ये पोहोचण्यात अपयशी ठरला. स्पर्धा संपल्यानंतर हे स्पष्ट झाले की, कर्णधार हार्दिक पांड्याला सूर्यासह संघातील वरिष्ठ खेळाडूंचा पाठिंबा नव्हता. आता या दोघांनी सोशल मीडियावर आपली मैत्री संपवल्यामुळे, हे स्पष्ट झाले आहे की मुंबई इंडियन्समध्ये हार्दिक आणि सूर्या यांचे एकमेकांशी पटत नव्हते. दरम्यान सूर्यकुमारही यावर्षी फॉर्ममध्ये नाही आणि हार्दिक पांड्यालाही अनेक वेळा ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. 

IND A vs SL A: वैभव सूर्यवंशीची जादू ‘अपयशी’, केवळ 14 धावांवर आऊट; चाहते नाराज

सूर्याकडून टीम इंडियाचे कर्णधारपद काढून घेण्यात आले

मुंबई इंडियन्स आणि हार्दिक याच्यासोबतच सूर्यकुमार यादवलाही टीम इंडियामधून वगळण्यात आल्याने तो सध्या चर्चेत आहे. इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्धच्या मालिकेसाठी सूर्याचा भारतीय संघात समावेश नव्हता. इतकेच नाही, तर त्याने आपले कर्णधारपदही गमावले आहे. यावर्षी आपल्या कर्णधारपदाखाली सूर्याने टीम इंडियाला टी-२० विश्वचषकापर्यंत पोहोचवले होते. आता श्रेयस अय्यरची कर्णधार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

सूर्या आणि हार्दिक यांच्यातील मतभेदांमागे काय कारण असू शकते?

हार्दिक आणि सूर्या यांच्यातील मतभेदांमागे अनेक कारणे असू शकतात. टीम इंडियाचे कर्णधारपद हे एक प्रमुख कारण मानले जात आहे. जेव्हा रोहित शर्माने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२४ नंतर निवृत्ती घेतली, तेव्हा हार्दिक पांड्याचे नावही नवीन कर्णधारपदाच्या शर्यतीत होते. त्यावेळी हार्दिक संघाचा उपकर्णधारही होता. त्याने रोहितच्या आधीही संघाचे कर्णधारपद भूषवले होते आणि टी-२० मध्ये त्याला दीर्घकाळ कर्णधार म्हणून कायम ठेवण्याची योजना होती. मात्र, दुखापतीमुळे तो संघात सतत आत-बाहेर होत होता, ज्यामुळे निवड समितीला त्याच्या जागी दुसऱ्या खेळाडूचा शोध घ्यावा लागला.

२०२४ च्या टी२० विश्वचषकानंतर, जेव्हा रोहितच्या उत्तराधिकाऱ्याचा प्रश्न आला, तेव्हा हार्दिक एक प्रमुख दावेदार होता. मात्र, रोहित शर्माच्या सल्ल्यानुसार सूर्यकुमार यादवला कर्णधारपद देण्यात आले. सूर्याच्या कर्णधारपदाखाली संघाने चांगली कामगिरी केली, पण टीम इंडियाचा कर्णधार म्हणून आपली निवड न झाल्याने हार्दिकच्या मनात काही प्रमाणात नाराजी नक्कीच असणार असा कयास बांधला जात आहे. त्याला सूर्याच्या कर्णधारपदाखाली भारतासाठी खेळावे लागले. दरम्यान, आयपीएलमध्ये हार्दिक कर्णधार होता आणि सूर्या त्याच्या नेतृत्वाखाली खेळला. परिणामी, कर्णधारपदावरून झालेल्या या संघर्षामुळे दोन्ही खेळाडूंमध्ये दुरावा निर्माण झाला असावा. मैदानावरही अनेकदा या दोघांना एकमेकांपासूनच दूरच पाहण्यात आले आहे आणि त्याचाच फटका मुंबई इंडियन्सला भोगावा लागला असणार असंही आता चाहते म्हणत आहेत. 

Suryakumar Yadav: टीम इंडियानंतर आता Mumbai Indians मधूनही मिळणार सूर्यकुमारला डच्चू? समोर आला मोठा पुरावा

Web Title: Hardik pandya and suryakumar yadav unfollowed each other on instagram is friendship broken

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 09, 2026 | 12:17 PM

Topics:  

  • Hardik Pandya
  • indian cricket team
  • Suryakumar Yadav

संबंधित बातम्या

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?
1

धक्कादायक अन् भीषण! ICC World Cup 2027 मध्ये रोहित-विराटला डच्चू? अभिनव मुकुंदनुसार कशी असणार टीम?

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…
2

IND Vs ZIM Live: अय्यर एक तरी सामना जिंकव रे! जाणून घ्या हरारेचा पिच रिपोर्ट अन्…

Abhishek Sharma: इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर अभिषेक शर्मा, 6000 पार करण्यासाठी 16 धावा दूर, 200 व्या सामन्यात करणार कारनामा
3

Abhishek Sharma: इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर अभिषेक शर्मा, 6000 पार करण्यासाठी 16 धावा दूर, 200 व्या सामन्यात करणार कारनामा

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता
4

ICC World Cup 2027: दोन वेळा जिंकले पण आता वणवण भटकावे लागणार? वर्ल्डकपमध्ये ‘हा’ संघ नसण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.