भारताचा माजी कर्णधार सूर्यकुमार यादव (फोटो- ians)
इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा
भारतीय संघात मिळाले नाही सूर्यकुमार यादवला स्थान
श्रेयस अय्यर असणार टी 20 संघाचा नवा कर्णधार
BCCI: आज बीसीसीआयने भारतीय संघाची इंग्लंड आणि आयर्लंड दौऱ्यासाठी घोषणा केली आहे. या दरम्यान भारतीय टी 20 संघाचा कर्णधार म्हणून श्रेयस अय्यरच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. दरम्यान बीसीसीआयने टी 20 वर्ल्ड कप जिंकवून देणाऱ्या सूर्यकुमार यादवचे कर्णधारपद काढून घेतले आहे. तसेच त्याला संघाला देखील स्थान देण्यात आले नाही.
सूर्यकुमारची एक पोस्ट मोठ्या प्रमाणात व्हायरल झाली आहे. सूर्यकुमार यादवच्या ठिकाणी आता आयपीएलमध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या श्रेयस अय्यरकडे कर्णधारपदाची जबाबदारी असणार आहे. त्यानंतर माजी कर्णधार सूर्यकुमार यादवने एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये तो काय म्हणाला आहे, ते जाणून घेऊयात.
काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
कर्णधारपद गमावल्यानंतर आणि संघात स्थान न मिळाल्यानंतर सूर्यकुमार यादवने एक पोस्ट शेयर केली आहे. त्यामध्ये त्याने “Wishing this highly skilled group all the best for challenges ahead अशा आशयाची पोस्ट केली आहे. यामध्ये सूर्यकुमारने ‘पुढील आव्हानांसाठी या अत्यंत कुशल आणि प्रतिभावान संघाला माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा’, असा संदेश लिहिला आहे.
‘सरपंच’ इज बॅक! Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार ; इंग्लंड-आयर्लंडचे धाबे दणाणले
Shreyas Iyer सांभाळणार T20 चा कारभार
बीसीसीआयने श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून घोषित केले आहे. तर तिलक वर्माला उपकर्णधार म्हणून जबाबदारी दिली गेली आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला या संघात स्थान देण्यात आले आहे. टीम इंडिया इंग्लंड आणि आयर्लंडविरुद्ध टी – 20 सामना खेळणार आहे.
आयपीएलमधील खराब कामगिरीमुळे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदावरून हटविण्यात आले आहे. तर श्रेयस अय्यरला कर्णधार म्हणून संधी देण्यात आली आहे. या दोन्ही सिरिजसाठी 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीची देखील निवड करण्यात आलेली आहे. त्यामुळे आता वैभव भारतीय संघाकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळताना दिसणार आहे. आयपीएलमधील उत्कृष्ट नेतृत्व आणि कामगिरीच्या जोरावर श्रेयस अय्यर आता भारताचा पूर्णवेळ टी-२० कर्णधार बनला आहे. मागील काही काळापासून खराब फॉर्मशी झगडत असलेल्या सूर्यकुमार यादवला टी-२० संघातून थेट बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे.
भारताचा संघ: श्रेयस अय्यर (कर्णधार ), तिलक वर्मा, संजू सॅमसन, इशान किशन, अभिषेक शर्मा, वैभव सूर्यवंशी, शिवम दुबे, नितीश कुमार रेड्डी, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, वरुण चक्रवर्ती, रवी बिश्नोई, मोहम्मद सिराज, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, प्रिन्स यादव.






