हार्दिक पंड्या(फोटो-सोशल मीडिया)
Hardik Pandya reveals his success : ९ डिसेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहीला टी२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी पराभव केला.९ डिसेंबर रोजी भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पहीला टी२० सामना खेळला गेला. या सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा १०१ धावांनी पराभव केला. या विजयासह भारताने पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली. हार्दिक पंड्या भारताच्या विजयाचा हीरो ठरला. त्याने २८ चेंडूत नाबाद ५९ धावा फटकावल्या. दुखापतीतून बरे झाल्यानंतर टीम इंडियाचा स्टार अष्टपैलू हार्दिक पंड्याने ही विजयी खेळी केली. त्याच्या या कामगिरीबद्दल बोलताना हार्दिकने असा विश्वास व्यक्त केला की केवळ तंदुरुस्तीच नाही तर सकारात्मक मानसिकता हे पुनर्प्राप्तीसाठी सर्वात शक्तिशाली साधन आहे. आशिया कप २०२५ दरम्यान दुखापत झाल्यानंतर, हार्दिक पंड्याने स्वतःला वचन दिले की तो पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होऊन परत येणार.
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या पहिल्या टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यात हार्दिक पंड्याने जबरदस्त अष्टपैलू कामगिरी केली आणि आपले दमदार पुनरागमन केले. त्याने फक्त २८ चेंडूचा सामना करत नाबाद ५९ धावा फटकावल्या. इतकेच नाही तर त्याने १६ धावांत एक बळी देखील टिपला. हार्दिकच्या दमदार उपस्थितीमुळे भारताने सामना १०१ धावांनी आपल्या नावे केला आणि मालिकेची विजयी सुरुवात केली.
बीसीसीआय टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत हार्दिकने सांगितले की, दुखापती केवळ शरीरालाच नव्हे तर मनाला देखील आव्हान देत असतात. अशा काळात आत्मविश्वास टिकवून ठेवणे सर्वात कठीण काम असते. कुटुंब आणि जवळच्या लोकांचा पाठिंबा त्याला आत्मविश्वास परत मिळवण्याची ताकद देतो असे देखील त्याने स्पष्ट केले. हार्दिकच्या मते, जर एखादा खेळाडू आत्मविश्वास गमावला तर मैदानावर परतणे अशक्य होऊन बसते.
हार्दिक पंड्याने हे देखील स्पष्टपणे सांगितले की, आत्मविश्वास आतून येत असतो. लोक त्याच्याबद्दल काय विचार करतात याची त्याला जास्त काळजी वाटत नाही. तो स्वतःला कसा पाहतो हे त्याच्यासाठी अजस्ट महत्वाचे असल्याचे तो सांगतो. हार्दिक पुढे म्हणाला की, तो एक सरळ आणि प्रामाणिक व्यक्ती आहे आणि मैदानावर तसाच राहणे पसंत करत असतो. या विचारसरणीमुळे त्याला मैदानात दबावात देखील मुक्तपणे खेळण्याचे स्वातंत्र्य मिळते. हार्दिक पुढे सांगतो की, आता त्याचे ध्येय फक्त खेळाचा आनंद घेणे आहे. त्याची प्राथमिकता मैदानावरील प्रत्येक क्षण जगणे असून त्यासोबत स्वतःमध्ये सुधारणा करणे आहे. तो स्वतःला कोणत्याही दबावाखाली ठेवण्याची परवानगी देत नाही.
हेही वाचा : IND vs SA 1st T20 : ‘यॉर्कर किंग’चा जागतिक क्रिकेटमध्ये कहर! ‘ही’ कामगिरी करणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज
हार्दिक पंड्याने रॉकस्टार्सना त्याची प्रेरणा मानले आहे. त्याने असा विश्वास व्यक्त केला आहे की ज्याप्रमाणे एक रॉकस्टार स्टेजवर येतो आणि काही मिनिटांत प्रेक्षकांना उत्साहित करतो, त्याचप्रमाणे तो मैदानावर देखील चाहत्यांना रोमांचित करू इच्छितो.






