IPL 2026 पूर्वी KKR ला मोठा धक्का! (Photo Credit- X)
‘टाइम्स ऑफ इंडिया’च्या माहितीनुसार, हर्षित राणा टी-20 वर्ल्ड कपपूर्वी एका सराव सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. तेव्हापासून तो क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. या दुखापतीमुळे तो आयपीएलच्या आगामी हंगामात खेळू शकणार नाही, हे आता स्पष्ट झाले आहे. हर्षितच्या जागी अद्याप कोणत्याही भारतीय खेळाडूची घोषणा केकेआरने केलेली नाही.
🚨 REPORTS 🚨 Harshit Rana has been ruled out of the IPL 2026 due to injury. ❌ (Source – TOI)#Cricket #IPL #KKR pic.twitter.com/ZP3oRoTWE0 — Sportskeeda (@Sportskeeda) March 13, 2026
IPL 2026 साठी BCCI चे नवे नियम! सराव सत्र मार्गदर्शक तत्त्वे केली जारी, संघ आता हे करू शकणार नाहीत…
हर्षित राणाच्या दुखापतीचे स्वरूप गंभीर असल्याने फेब्रुवारी महिन्यात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. हर्षितने स्वतः सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांना याबद्दल माहिती दिली होती. “शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून, आता माझे संपूर्ण लक्ष रिकव्हरीवर आहे. ज्या खेळावर मी मनापासून प्रेम करतो, तिथे लवकर परतण्यासाठी मी उत्सुक आहे,” असे त्याने पोस्टमध्ये म्हटले होते. आयपीएलपर्यंत तो तंदुरुस्त होईल अशी आशा चाहत्यांना होती, मात्र पूर्णपणे फिट होण्यासाठी त्याला अद्याप काही काळ लागणार आहे.
हर्षित राणा बाहेर झालेला असतानाच, केकेआरने झिम्बाब्वेच्या ब्लेसिंग मुजरबानी याला आपल्या ताफ्यात सामील केले आहे. ६ फूट ८ इंच उंचीचा हा उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज टी-20 क्रिकेटमध्ये आपल्या भेदक मारा आणि उसळी घेणाऱ्या चेंडूंसाठी ओळखला जातो. त्याने 80 हून अधिक आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांत 21 च्या सरासरीने 90 हून अधिक बळी घेतले आहेत. मुजरबानी 17 मार्च रोजी कोलकाता येथे पोहोचणार असून तो संघासोबत सराव सत्रात सहभागी होईल.
अजिंक्य रहाणे (कर्णधार), रिंकू सिंह, सुनील नरेन, वरुण चक्रवर्ती, अंगकृष रघुवंशी, मनीष पांडे, कॅमरन ग्रीन, फिन ॲलन, तेजस्वी सिंह, राहुल त्रिपाठी, टिम सीफर्ट, रोवमन पॉवेल, अनुकूल रॉय, सार्थक रंजन, दक्ष कामरा, रचिन रवींद्र, रमनदीप सिंह, वैभव अरोरा, मथीशा पथिराना, कार्तिक त्यागी, प्रशांत सोलंकी, आकाश दीप, उमरान मलिक, ब्लेसिंग मुजरबानी.
मॅच फिक्सिंग प्रकरणात मोठी कारवाई, IPL 2026 पूर्वी केकेआरच्या माजी खेळाडूवर आयसीसीची बंदी






