फोटो सौजन्य - JioHotstar
Kolkata Knight Riders vs Royal Challengers Bangalore : आयपीएल २०२५ च्या नव्या १८ व्या सिझनची २२ मार्चपासून सुरुवात झाली आहे. या पहिल्याच सामन्यात कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यामध्ये सामना झाला. या सामन्यांमध्ये आरसीबीच्या संघाने केकेआरला ७ विकेट्सने पराभूत केले. यामध्ये अजिंक्य रहाणेने, विराट कोहली आणि फिल्ल सॉल्ट यांनी पहिल्याच सामन्यात अर्धशतक ठोकले. आरसीबीने हा सामना जिंकला, पण स्पर्धेच्या पहिल्या सामन्यातही एक वाद दिसून आला. या सामान्यादरम्यानचा आता एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोलकाता नाईट रायडर्सचा सलामीवीर फलंदाज सुनील नारायण याने कमालीची फलंदाजी केली.
पण ता सुनील नारायणची बॅट स्टंपला लागली पण पंचांनी त्याला हिट विकेट दिली नाही आणि तो बाद झाला नाही. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा कर्णधार रजत पाटीदार, फलंदाज विराट कोहली आणि इतर खेळाडूंनाही आश्चर्य वाटले. फलंदाजाला हिट विकेट का देण्यात आली नाही? हा प्रश्न प्रत्येकाच्या मनात आहे, पण याबद्दल नियम काय म्हणतात ते जाणून घ्या.
IPL 2025 :अजिंक्य रहाणेने रचला इतिहास, आयपीएलमध्ये ही कामगिरी करणारा ठरला भारताचा पहिला क्रिकेटपटू
व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये सुनील नरेनची बॅट स्टंपला लागली, पण त्याला तरीही बाद देण्यात आले नाही. बऱ्याचदा आपण पहिले आहे की, फलंदाजी करताना, जर फलंदाजाची बॅट किंवा क्रिकेटचे कोणतेही साहित्य लागले अथवा शरीराचा कोणताही भाग स्टंपवर आदळला तर फलंदाजाला बाद केले जाते म्हणजेच हिट विकेट दिली जाते. पण कालच्या सामन्यांमध्ये असे घडले नाही त्यामुळे या वाद सोशल मीडियावर आणखीच गाजला आहे. केकेआरचा संघ फलंदाजी करत असताना डावातील ८ व्या षटकातील चौथा चेंडू सुनील नरेनच्या अंगावर गेला. सुनील नरेनने चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला पण चेंडू वर जाताना दिसला तेव्हा त्याने मागे न पाहता बॅट खाली केली आणि ती बॅट स्टम्पला लागली.
Sunil Narine’s hit-wicket appeal sparks controversy.
Full Details: https://t.co/Gj0r79DC6W pic.twitter.com/EWKrUATnvI
— CricketGully (@thecricketgully) March 22, 2025
यादरम्यान, त्याची बॅट खूप मागे गेली आणि स्टंपवर आदळली. अशा परिस्थितीत फलंदाजाला हिट विकेट आउट द्यायला हवी होती पण असे झाले नाही. तथापि, येथे एक वेगळा नियम लागू होता. खरं तर, सुनील नरेनची बॅट स्टंपवर आदळण्यापूर्वीच स्क्वेअर लेग अंपायरने चेंडू वाईड घोषित केला होता. अशाप्रकारे चेंडू त्याच क्षणी मृत झाला. यानंतर, काहीही झाले तरी, पंचांचा निर्णय वैध असणार असा नियम आहे.
आयपीएलच्या खेळण्याच्या परिस्थितीनुसार जर चेंडू डेड असेल आणि जर त्याचे शरीर किंवा बॅट स्टंपला स्पर्श झाला तर फलंदाजाला हिट विकेट दिली जाणार नाही असे नियम ३५ हेच सांगतो किंवा लागू होतो. विराट कोहली, टिम डेव्हिड आणि रजत पाटीदार यांनीही थोडे अपील केले पण चेंडू वाईड गेला आणि त्यांना हिट विकेट होण्यापासून वाचवण्यात आले. जर चेंडू वाईड झाला नसता तर सुनील नरेनला निश्चितच पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले असते.