रवी बिश्नोई(फोटो-सोशल मीडिया)
Ravi Bishnoi : टीम इंडियाकडून खेळणारा फिरकी गोलंदाज रवी बिश्नोई सद्या चर्चेत आला आहे. त्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तूफान व्हारयल होत आहे. या व्हिडिओमध्ये तो पोहताना दिसत असून त्याने हा व्हिडिओ पोहताना बनवलेला आहे. या व्हिडिओबाबत रवी बिश्नोईने धक्कादायक खुलासा केला आहे. त्याने म्हटले आहे की, हा व्हिडिओ बनवताना तो तीन वेळा बुडाला होता. यापूर्वी असे अनेक खूप वेळा घडले आहे की, व्हिडिओ बनवताना लोकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे. अशाच घटनेतून रवी बिश्नोई देखील थोडक्यात बचावला असल्याचे समजते.
बिश्नोई स्वतः त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर केला तो त्याबद्दल सांगत आहे. या दरम्यान, रवी बिश्नोईने सांगितले आहे की, तो हा व्हिडिओ बनवताना तीन वेळा बुडाला आहे. परंतु, तो नेमका कुठे बुडण्याबद्दल बोलला होता हे मात्र समोर येऊ शकले नाही.
हेही वाचा : पाकिस्तान नवीन WTC सायकलसाठी सज्ज, या अनुभवी खेळाडूला दिली मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी
हा व्हिडिओ रवी बिश्नोईने त्याच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या दरम्यान तो एका स्विमिंग पूलमध्ये दिसत आहे आणि हा व्हिडिओ तिथेच शूट करण्यात आला आहे. व्हिडिओ शेअर करताना बिश्नोईने लिहिले आहे की, “हा व्हिडिओ घेण्यासाठी मी ३ वेळा बुडलो… मी कौतुकास पात्र आहे.”
रवी बिश्नोईने २०२२ मध्ये टीम इंडियासाठी पदार्पण केलेया आहे. आतापर्यंत त्याने भारतीय संघासाठी एकूण ४२ टी-२० सामने खेळेल आहेत तर १ एकदिवसीय सामना खेळला आहे. या दरम्यान त्याच्या नावावर ६१ विकेट्स जमा आहेत. त्याच वेळी, बिश्नोईने एका एकदिवसीय सामन्यात एक विकेट देखील घेतली आहे.
हेही वाचा : अॅथलेटिक्स सोडलं, क्रिकेटला दिलं प्राधान्य! भारतीय संघात स्थान मिळाले नाही…आता परदेशात करणार धमाल
रवी बिश्नोईला पांढऱ्या क्रिकेटमध्ये टीम इंडियाचा एक प्रमुख भाग आहे. याशिवाय, तो आयपीएलमध्ये देखील काही संघांसाठी खेळला आहे. सध्या रवी बिश्नोई हा लखनऊ सुपर जायंट्सकडून खेळतो आहे. या वर्षी त्याला फ्रँचायझीनकडून ११ कोटींना रिटेन करण्यात आले होते. त्याने एकूण ७२ टी-२० सामने खेळले असून या काळात त्याने ७२ विकेट्स देखील घेतल्या आहेत.