फोटो सौजन्य – X
WTC सायकलला सुरुवात झाली आहे, जगभरामध्ये क्रिकेटचे सामने खेळवले जात आहेत. भारताच्या संघाचा इंग्लडविरुद्ध सामना सुरु आहे, तर ऑस्ट्रेलियाचा वेस्ट इंडीजविरुद्ध सुरु आहे. श्रीलंका आणि बांग्लादेश या दोन संघामध्ये मालिका पार पडली. या मालिका सुरु असताना ऑस्ट्रेलियाचा संघ चांगली कामगिरी करत आहे. याचदरम्यान पाकिस्तान क्रिकेट बोर्डासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने माजी अष्टपैलू अझहर महमूद यांची नवीन कार्यकारी रेड-बॉल मुख्य प्रशिक्षक म्हणून घोषणा केली आहे.
अझहर हा बऱ्याच काळापासून पाकिस्तान पुरुष संघाचा गोलंदाजी प्रशिक्षक आणि सहाय्यक मुख्य प्रशिक्षक आहे. बोर्डाने आता त्याला एक नवीन जबाबदारी दिली आहे. त्याचा सध्याचा करार संपेपर्यंत तो या पदावर राहील. पाकिस्तान क्रिकेट बोर्डला विश्वास आहे की अझहर या भूमिकेत यशस्वी होऊ शकतो. त्याला यापूर्वी खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून अनुभव आहे. “अनुभवी क्रिकेटपटू अझहर महमूद यांच्याकडे या भूमिकेसाठी प्रचंड अनुभव आहे.
अॅथलेटिक्स सोडलं, क्रिकेटला दिलं प्राधान्य! भारतीय संघात स्थान मिळाले नाही…आता परदेशात करणार धमाल
राष्ट्रीय संघाचे सहाय्यक मुख्य प्रशिक्षक म्हणून काम केलेले अझहर हे बऱ्याच काळापासून संघाच्या धोरणात्मक गाभ्याचा एक महत्त्वाचा भाग आहेत. खेळाचे त्यांचे सखोल ज्ञान, आंतरराष्ट्रीय अनुभव आणि इंग्लिश काउंटी सर्किटमधील सिद्ध यश यामुळे ते या पदासाठी योग्य आहेत,” असे एका प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
Former all-rounder Azhar Mahmood has been appointed by the PCB as the national team’s acting red-ball head coach, replacing Aaqib Javed. pic.twitter.com/3sU0V3AHRZ
— Circle of Cricket (@circleofcricket) June 30, 2025
पुढे ते म्हणाले की, “त्याचा रेड-बॉल वारसा दोन काउंटी चॅम्पियनशिप जेतेपदांनी अधोरेखित केला आहे, ही कामगिरी त्याच्या नेतृत्व, कौशल्य आणि उत्कृष्टतेसाठी अढळ वचनबद्धतेबद्दल बरेच काही सांगते. पीसीबीला विश्वास आहे की अझहरच्या मार्गदर्शनाखाली रेड-बॉल संघ जागतिक स्तरावर त्याची ताकद, शिस्त आणि कामगिरीत वाढत राहील,” असे प्रसिद्धीपत्रकात सांगितले आहे.
माजी वेगवान गोलंदाज आणि १९९२ च्या आयसीसी पुरुष क्रिकेट विश्वचषक विजेत्या आकिब जावेद गेल्या वर्षीच्या अखेरीस ऑस्ट्रेलियन जेसन गिलेस्पी यांच्या निवृत्तीनंतर रेड-बॉल प्रशिक्षक म्हणून काम पाहत आहेत. महमूद यांचे पहिले काम नवीन आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप सायकलसाठी संघ तयार करणे असेल. या वर्षाच्या अखेरीस दक्षिण आफ्रिकेच्या दोन सामन्यांच्या मालिकेसाठी पाकिस्तान दौऱ्याने त्याची सुरुवात होणार आहे.