सौजन्य - BCCI ICC Rankings : जसप्रीत बुमराह ठरला जगातील सर्वोत्तम गोलंदाज; 'या' दिग्गजांना मागे टाकत जागतिक क्रमवारीत गाठला 1 नंबर
ICC Test Rankings Jasprit Bumrah : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात धुमाकूळ घालणारा भारताचा स्टार वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह कसोटी क्रिकेटमध्ये जागतिक क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा गोलंदाज बनला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) कसोटी क्रिकेटमधील गोलंदाजांची नवीनतम क्रमवारी जाहीर केली. यामध्ये बुमराहने दोन दिग्गजांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे.
जसप्रीत बुमराह ठरला अव्वल गोलंदाज
The Numero Uno in the ICC Men's Test Bowler Rankings 🔝
Jasprit Bumrah 🫡 🫡
Congratulations! 👏👏#TeamIndia | @Jaspritbumrah93 pic.twitter.com/mVYyeioOSt
— BCCI (@BCCI) November 27, 2024
पहिल्या कसोटीत आठ विकेट
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटीत आठ विकेट घेतल्या होत्या. बुमराहने पहिल्या डावात पाच आणि दुसऱ्या डावात तीन विकेट्स घेतल्या. आपल्या दमदार कामगिरीमुळे बुमराहने ICC कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत दोन महान गोलंदाजांचा पराभव केला. बुमराह आता कसोटीतील नंबर 1 गोलंदाज बनला आहे.
बुमराह बनला जागतिक क्रमवारीत नंबर 1 गोलंदाज
दक्षिण आफ्रिकेचा घातक वेगवान गोलंदाज कागिसो रबाडा आयसीसी कसोटी क्रमवारीत पहिल्या स्थानावर होता. ऑस्ट्रेलियाचा जोश हेझलवूड दुसऱ्या स्थानावर होता. भारताचा बुमराह तिसऱ्या क्रमांकावर होता. आता बुमराहने या दोन वेगवान गोलंदाजांना मागे टाकत पहिले स्थान मिळवले आहे. जसप्रीत बुमराहचे आता ताज्या आयसीसी क्रमवारीत ८८३ रेटिंग गुण आहेत. तर कागिसो रबाडाचे आता ८७२ रेटिंग गुण आहेत. रबाडाची आता दुसऱ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. याशिवाय जोश हेझलवूड 860 रेटिंग गुणांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
बुमराहकडून नंबर वनचे विजेतेपद हिसकावण्यात आले
याआधीही बुमराह आयसीसी कसोटी क्रमवारीत नंबर-1 गोलंदाज होता. 30 ऑक्टोबर रोजी बुमराहकडून नंबर वनचे विजेतेपद हिसकावण्यात आले. त्यानंतर बुमराहला मागे टाकत कागिसो रबाडा कसोटीत जगातील नंबर वन बनला. आता २७ दिवसांनंतर बुमराहने पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे. ताज्या आयसीसी क्रमवारीत, दोन अन्य भारतीय गोलंदाजांचाही टॉप-10 मध्ये समावेश आहे. ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विन चौथ्या क्रमांकावर आहे. त्याच्यासह गोलंदाज रवींद्र जडेजा सातव्या स्थानावर आहे.
अॅडलेडवर पहिला कसोटी सामना
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा सामना काल संपला आणि भारताच्या संघाने कसोटी क्रिकेटमध्ये कमालीचा कमबॅक केला आहे. भारताच्या संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या मालिकेत पराभव स्वीकारल्यानंतर टीम इंडियाने गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाला त्याच्या घरच्या मैदानावर पहिल्या कसोटीत पराभूत केले आहे. भारताच्या संघाने कॅप्टन रोहित शर्माच्या अनुपस्थित जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली पहिला कसोटी सामन्यात विजय मिळवून मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.
रोहित शर्मा होणार सामील
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा, पितृत्व रजा संपल्यानंतर पर्थला पोहोचला आहे, त्यानंतर लगेचच तो सरावासाठी ताबडतोब नेटवर पोहोचला, तर कर्णधार जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव केला. काही दिवसांपूर्वी मुलाच्या जन्मानंतर, रोहित शर्मा रविवारी संध्याकाळी पर्थला पोहोचला आणि ऑस्ट्रेलियन भूमीवर भारताच्या सर्वात मोठ्या कसोटी विजयाचा साक्षीदार होण्यासाठी ड्रेसिंग रूममध्ये उपस्थित होता.