सलग दोन विजयानंतर, टीम इंडिया या सामन्यातही विजयाची हॅटट्रिक साधण्यासाठी मैदानात उतरेल. तर दक्षिण आफ्रिका संघही पाकिस्तानला धूळ चारल्यानंतर सेमिफायनच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी भिडेल. दोन्हीही संघासाठी हा सामना महत्वाचा असणार आहे. त्यामुळे आजच्या सामन्यात चुरशीची लढत पाहायला मिळू शकते.
मँचेस्टरमधील एमिरेट्स ओल्ड ट्रॅफर्डची खेळपट्टी फलंदाजांसाठी अनुकूल मानली जाते. परंतु, वेगवान गोलंदाजांनाही चांगली मदत मिळते. या मैदानावर पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १९० ते २०० धावांच्या दरम्यान असते, त्यामुळे एक मोठा धावसंख्येचा सामना अपेक्षित आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर या सामन्यात इतिहास रचणार आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा सामना हा तिच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील २०० वा टी२० सामना असेल. यासह, हरमनप्रीत पुरुष आणि महिला टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात २०० सामने खेळणारी जगातील पहिली क्रिकेटपटू बनेल. आतापर्यंत कोणत्याही पुरुष किंवा महिला क्रिकेटपटूने हा विक्रम केलेला नाही.
भारत: स्मृती मानधना, शेफाली वर्मा, यास्तिका भाटिया, जेमिमाह रॉड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कर्णधार), रिचा घोष (विकेटकीपर), दीप्ती शर्मा, प्रेमा रावत, अरुंधती रेड्डी, श्री चरणी, नंदनी शर्मा.
दक्षिण आफ्रिका: एल. वोल्वार्ड (कर्णधार), त्जामिन ब्रिट्स, ॲनेरी डेर्कसेन, डेन वॅन निकेर्क, मारिझान कॅप, नदिन डी क्लर्क, क्लो ट्रायॉन (विकेटकीपर), सिनालो जाफ्ता, शबनीम इस्माईल, अयाबोंगा खाका, नॉनकुलुलेको मलाबा.
FIFA World Cup 2026 मध्ये इतिहास! सर्वात जलद 100 गोल्सचा टप्पा पूर्ण, फुटबॉलचा रोमांचक शो






