फोटो सौजन्य - सोशल मीडिया
महिला T20 विश्वचषक २०२४ : बांग्लादेशमध्ये आरक्षणामुळे दिवसेंदिवस परिस्थिती बिघडत चालली आहे. महिला T२० विश्वचषक २०२४ हा ऑक्टोबर महिन्यामध्ये बांग्लादेशमध्ये आयोजित केला जाणार होता. परंतु आता बांग्लादेशच्या भवितव्यावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. परिस्थिती अशी आहे की, बांग्लादेश क्रिकेट बोर्डाचे (बीसीबी) अध्यक्ष लंडनमध्ये लपले आहेत. अशा परिस्थितीमध्ये विश्वचषक आयोजित करणे म्हणजेच खेळाडूंची सुरक्षा आणि अशा ठिकाणी खेळ खेळणे हा चिंतेचा विषय आहे. त्यामुळे आता बांग्लादेशमध्ये महिला T२० विश्वचषक २०२४ आयोजित न करता कोणत्या देशामध्ये विश्वचषक आयोजित केला जाणार आहे. यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
आता महिला T२० विश्वचषकाचे यजमान होण्यासाठी दोन देशांनी मान डोलावली आहे. नवीन यजमान देश म्हणून आयसीसीकडे दोन पर्याय खुले आहेत. नुकतीच बातमी आली की यूएईमध्ये विश्वचषक आयोजित केला जाऊ शकतो, मात्र आता झिम्बाब्वेनेही यजमानपदाच्या शर्यतीत उडी घेतली आहे. झिम्बाब्वे विश्वचषकाच्या यजमानपदाच्या शर्यतीत सामील झाला आहे आणि आयसीसी लवकरच यावर निर्णय देऊ शकते. त्यामुळे आयसीसी यावर काय निर्णय देईल हे पाहणे महत्वाचे ठरेल.
हेदेखील वाचा – पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचे हे दोन दिग्गज पॅरा खेळाडू असणार ध्वजवाहक!
झिम्बाब्वेने अलिकडच्या वर्षांत दोनदा एकदिवसीय विश्वचषक पात्रता स्पर्धेचे आयोजन केले आहे. या आफ्रिकन देशाने विश्वचषक यशस्वीपणे आयोजित करण्यास सक्षम असल्याचे सिद्ध केले आहे. महिला T२० विश्वचषक २०२४ चे यजमानपदही झिम्बाब्वेच्या हातात जाऊ शकते कारण ऑक्टोबर महिन्यातील हवामान क्रिकेट सामन्यांसाठी चांगले असेल. त्या दिवसांत झिम्बाब्वेमध्ये पावसाची शक्यता फारच कमी असेल. तर दुसरीकडे या आफ्रिकन देशाच्या स्टेडियममध्ये बसण्यासाठी फारशी जागा नाही. पण झिम्बाब्वेमध्ये क्रिकेटला चालना देण्याच्या आणि पायाभूत सुविधांमध्ये सुधारणा करण्याच्या दृष्टीने आयसीसीचा निर्णय खूप महत्त्वाचा ठरू शकतो. 20 ऑगस्टला विश्वचषकाचे यजमानपद कोण असेल याचा निर्णय आयसीसी देऊ शकते.