ऋचा घोष(फोटो-सोशल मीडिया)
IND W vs SA W: आयसीसी महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ स्पर्धा चांगलीच रंगात आली आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकातील दहावा सामना विशाखापट्टणम येथे खेळला जात आहे. या सामन्यात डॉ.वाय.एस. राजशेखर रेड्डी ACA-VDCA क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि दक्षिण आफ्रिका हे दोन संघ समानेसामने आले आहेत. या सामन्यात नाणेफेक गमावणाऱ्या भारतीय महिला संघाने ऋचा घोषच्या शानदार अर्धशतकाच्या जोरावर सर्वबाद २५१ धावा केल्या आहेत. दक्षिण आफ्रिकेच्या संघाला विजयासाठी २५२ धावा कराव्या लागणार आहेत. दक्षिण आफ्रिकेकडून क्लो ट्रायॉनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
सामन्यापूर्वी दक्षिण आफ्रिकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. तर भारतीय संघाला प्रथम फलंदाजीला यांत्रित केले. भारतीय संघाची सुरवात चांगली झाली होती. भारताची पहिली विकेट्स ५५ धावांवर गेली. स्मृती मानधनाच्या स्वरूपात भारताला पहिलं झटका लागला. मानधना २२ धावा करून माघारी परतली. त्यानंतर भारतच्या फलंदाजीला ग्रहण लागले आणि काही अंतराने भारतीय फलंदाज माघारी जात राहिले. १५३ धावांवर भारताने आपल्या ७ विकेट्स गामावल्या असताना ऋचा घोष मैदानात आली आणि तिने सामनाच फिरवून टाकला.
ऋचा घोषने आपल्या फलंदाजीचे कौशल्य दाखवत स्नेह राणा सोबत ५० च्यावर धावांची भागीदारी रचली. ऋचा घोष आणि स्नेह राणा या दोघींनी भारताचा डाव सावरला. स्नेह राणाने २४ चेंडूत ३३ धावा काढून बाद झाली. त्यानंतर ऋचा घोषने चांगली कामगिरी करत भारताला २५० च्या पार पोहचवले. ऋचा घोष ९४ धावांवर बाद झाली. तिने या खेळीत ११ चौकार आणि ४ षटकार लगावले. प्रतिका रावल ३७, हरलीन देओल १३ , हरमनप्रीत कौर ९ , जेमिमाह रॉड्रिग्स ०, दीप्ती शर्मा ४, अमनजोत कौर १३, श्री चरणी ० काढून बाद झाल्या तर क्रांती गौड ० धावांवर नाबाद राहिली. दक्षिण आफ्रिकेकडून क्लो ट्रायॉन ३, मारिजन कॅप २ , नादिन डी क्लर्क २ ,नॉनकुलुलेको म्लाबा २, तुमी सेखखुने १ विकेट घेतली.
प्रतिका रावल, स्मृती मानधना, हरलीन देओल, हरमनप्रीत कौर (कर्णधार), जेमिमाह रॉड्रिग्स, रिचा घोष (यष्टीरक्षक), दीप्ती शर्मा स्नेह राणा, क्रांती गौड, श्री चरणी, अमनजोत कौर
हेही वाचा :‘मला रोहित भाईचा संयम…’, कर्णधार शुभमन गिलने हिटमॅनकडून कोणता धडा गिरवला? वाचा सविस्तर
लॉरा वोल्वार्ड (कर्णधार), ताजमिन ब्रिट्स, सुने लुस, मारिजन कॅप, अनेके बॉश, सिनालो जाफ्ता, क्लो ट्रायॉन, नादिन डी क्लर्क, अयाबोंगा खाका, तुमी सेखखुने, नॉनकुलुलेको म्लाबा,