जो रूट(फोटो-सोशल मीडिया)
ICC Test Rankings : इंग्लंड आणि झिम्बाब्वे यांच्यातील नुकत्याच संपलेल्या कसोटी सामन्यानंतर आयसीसीकडून नवीन कसोटी क्रमवारी जाहीर करण्यात आली आहे. तथापि, इंग्लंडच्या तीन टॉप ऑर्डर फलंदाजांनी झिम्बाब्वेविरुद्ध शानदार फलंदाजी केली त्याचा फायदा त्यांना आयसीसी क्रमवारीमध्ये झालेला दिसून आला आहे. इंग्लंडचा सर्वोत्तम फलंदाज जो रूट ८८८ रेटिंग गुणांसह आयसीसीमध्ये पहिल्या क्रमांकावर विराजमान झाला आहे.
तसेच जो रूटचा साथीदार हॅरी ब्रूक ५८ धावांची शानदार खेळी खेळून ८७३ धावांसह आयसीसीमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. आयसीसी कसोटी क्रमवारीत कोणत्या खेळाडूंनी आपले स्थान निश्चित केले आहे? याबाबत माहिती घेऊ.
इंग्लंडचा फलंदाज जो रूट ८८८ रेटिंग गुणांसह आयसीसीमध्ये पहिल्या स्थानावर आहे. त्याच्या मागे हॅरी ब्रूक ८७३ रेटिंग गुण मिळवून दुसऱ्या स्थानावर आहे. जो रूट आणि हॅरी ब्रूक यांच्याव्यतिरिक्त, न्यूझीलंडचा केन विल्यमसन ८६७ गुण घेऊन तिसऱ्या स्थानावर आहे, तर भारताचा यशस्वी जयस्वाल ८४७ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. तसेच ऑस्ट्रेलियाचा स्टीव्ह स्मिथ ८२३ गुणांसह पाचव्या स्थानावर विराजमान आहे. तर जडेजा सध्या जगातील नंबर वन टेस्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून कायम आहे.
आयसीसीने जारी केलेल्या नवीन क्रमवारीच्या टॉप १० मध्ये ऑस्ट्रेलियाचा वरचष्मा दिसून येत आहे. ज्यामध्ये स्टीव्ह स्मिथ ८२३ गुणांसह पाचव्या स्थानावर आहे, ट्रॅव्हिस हेड ७४८ गुणांसह आठव्या स्थानावर आहे आणि सलामीवीर उस्मान ख्वाजा ७३९ गुणांसह नवव्या स्थानावर आहे. अशा प्रकारे आयसीसी नवीन क्रमवारीच्या टॉप १० मध्ये ३ ऑस्ट्रेलियन खेळाडूंचा समावेश आहे.
भारत पुढील महिन्यात म्हणजे जूनमध्ये इंग्लंडविरुद्ध पाच सामन्यांची कसोटी मालिका खेळायला इंगलंड दौऱ्यावर जाणार आहे. तथापि, यासोबतच २०२५-२७ च्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचे नवीन चक्र सुद्धा सुरू होणार आहे, त्यामुळे जर भारताचा सलामीवीर जयस्वालने येथे धावा केल्या तर तो ब्रूक आणि रूट दोघांसाठी देखील धोकदायक बनू शकतो. यशस्वी जयस्वालने कसोटी क्रिकेटमध्ये शानदार कामगिरी करून दाखवली आहे.
हेही वाचा : IPL Eliminator : हार्दिकच्या मुंबईचा गिलच्या टायटन्ससमोर लागणार कस! आज GT आणि MI समोरासमोर भिडणार..
यादरम्यान, पांढऱ्या चेंडूच्या क्रिकेटच्या क्रमवारीत देखील बदल झाले आहेत. वेस्ट इंडिजचा फलंदाज केसी कार्टी एकदिवसीय फलंदाजांच्या यादीत २० व्या क्रमांकावरून झेप घेऊन १६ व्या क्रमांकावर जाऊन पोहोचला आहे. या खेळाडूने अलीकडेच आयर्लंडविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात १७० धावांची जबरदस्त खेळी केली होती.