शुभमन गिल आणि हार्दिक पंड्या(फोटो-सोशल मिडिया)
IPL Eliminator : शुभमन गिलच्या नेतृत्वाखालील गुजरात टायटन्स शुक्रवारी इंडियन प्रीमियर लीग एलिमिनेटरमध्ये पाच वेळा चॅम्पियन मुंबई इंडियन्सशी भिडणार आहे. एलिमिनेटरमध्ये पराभूत होणारा संघ स्पर्धेतून बाहेर फेकल्या जाणार आहे. तर विजेत्या संघाला दुसऱ्या क्वालिफायरमध्ये खेळण्याची संधी मिळणार आहे. खराब सुरुवात झाली असून देखील मुंबई इंडियन्स संघ प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवण्यात यशस्वी झाला आहे. टायटन्सने गेल्या चार हंगामात तिसऱ्यांदा प्ले-ऑफमध्ये स्थान मिळवले आहे आणि या काळात २०२२ मध्ये पदार्पणातच जेतेपदही जिंकले. तथापि, गिल आणि हार्दिक दोघांनाही सिद्ध करायचे आहे.
टायटन्स अधिक चिंतेत पडणार आहे. कारण, प्ले ऑफपूर्वी त्यांची गती कमी झाली आहे. संघाने गेल्या दोन पराभवांमध्ये विरोधी संघाला ४६५ धावा दिल्या आहेत. आता त्यांना चेंडूने चांगली कामगिरी करावी लागेल. संघाच्या वेगवान गोलंदाजीचा मुख्य खेळाडू मोहम्मद सिराजला पॉवर प्लेमध्ये संघाला यश मिळवून द्यावे लागणारया आहे. डावखुरा वेगवान गोलंदाज अर्शद खानला नवीन चेंडूने संघर्ष करावा लागला आहे, ज्यामुळे टायटन्सच्या समस्या वाढल्या आहेत आणि प्रसिद्ध कृष्णासारख्या गोलंदाजांवर दबाव वाढला आहे. वेगवान गोलंदाजी, विभागाती कमकुवतपणाव्यतिरिक्त, फिरकी गोलंदाज रशीद खानच्या अकार्यक्षमतेमुळे गोलंदाजीमध्ये संघाच्या अडचणी आणखी वाढल्या आहेत.
टायटन्सप्रमाणे, परदेशी खेळाडूंच्या जाण्यामुळे मुंबईलाही त्रास सहन करावा लागला आहे. रायन रिकेल्टनने टॉप ऑर्डरमध्ये रोहित शर्मासोबत चांगली कामगिरी केली आहे, परंतु हा दक्षिण आफ्रिकेचा फलंदाज आता राष्ट्रीय संघात सामील झाला आहे. इंग्लंडचा फलंदाज विल जॅक्सबाबतही असेच आहे. इंग्लंड संघाबाहेर असलेल्या फलंदाज जॉनी बेअरस्टो व्यतिरिक्त, मुंबईने रिचर्ड ग्लीसन आणि चरित अस्लंका यांना संघात समाविष्ट केले आहे. एलिमिनेटरमध्ये रोहितसोबत बेअरस्टो डावाची सुरुवात करू शकतो. मधल्या फळीत तिलक वर्माची खराब कामगिरी देखील मुंबईसाठी चिंतेचे कारण आहे. सूर्यकुमारने फलंदाजीत मुंबईसाठी सातत्याने चांगली कामगिरी केली आहे आणि त्याने चालू हंगामात ६४० धावा केल्या आहेत. जर तो अपयशी ठरला तर मुंबईचा मार्ग खूप कठीण होईल. जसप्रीत बुमराह आणि ट्रेंट बोल्ट सारख्या गोलंदाजांच्या नेतृत्वाखाली मुंबईचे गोलंदाज विरोधी संघाला अधिक त्रास देत आहेत.
हेही वाचा : IND Vs END : भारतीय ‘अ’ संघाची आता खरी कसोटी, इंग्लंड लायन्स विरुद्ध करणार दोन हात..
फलंदाजी विभागात, साई सुदर्शन, गिल आणि जोस बटलर या तीन अव्वल फलंदाजांनी संघाला प्ले-ऑफमध्ये पोहोचवण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. बटलर लीग टप्प्यानंतर राष्ट्रीय संघात सामील होण्यासाठी त्याच्या मायदेशी रवाना झाला आहे आणि प्ले-ऑफमध्ये संघाला त्याची उणीव भासेल. बटलरच्या पर्याय म्हणून संघाने कुसल मेंडिसचा संघात समावेशआहे, परंतु तो इंग्लंडच्या या स्टार फलंदाजाची पोकळी भरून काढू शकतो की नाही हे पाहणे बाकी आहे. टायटन्सच्या मधल्या फळीत असलेले शाहरुख खान आणि शेरफेन रदरफोर्ड हे सर्वात विश्वासार्ह खेळाडूंमध्ये नाहीत, ज्यामुळे मुंबईविरुद्ध टायटन्सचा मार्ग सोपा होणार नाही.