फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताचा संघ आज त्याच्या विश्वचषकाच्या स्पर्धेची सुरूवात वानखेडे मैदानावर करणार आहेत. सोशल मिडियावर सध्या या विश्वचषकाची मागील काही महिन्यापासून मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायाल मिळाली आहे. आज या सामन्यामध्ये भारताचा संघ यूएसविरूद्ध खेळताना दिसणार आहे. 2024 मध्ये झालेल्या विश्वचषकानंतर भारताच्या संघाने एकही मालिका गमावली नाही त्याचबरोबर दिग्गज खेळाडूंनी टी20 विश्वचषकातून निवृती घेतल्यानंतर पहिल्यांदाच भारताचा संघ विराट कोहली आणि रोहित शर्मा यांच्या अनुपस्थित खेळताना दिसणार आहे.
या पहिल्या सामन्याआधी भारताच्या संघामध्ये मोठा बदल पाहायला मिळाला तो म्हणजेच हर्षित राणाच्या जागेवर मोहम्मद सिराज याला संघामध्ये स्थान मिळाले आहे. पहिल्या सामन्यामध्ये भारतीय संघाची प्लेइंग 11 कशी असणार आहे याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे. भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह तापामुळे अमेरिकेविरुद्धच्या टी-२० विश्वचषक सामन्यात खेळणार नाही. शनिवारी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर भारत आणि अमेरिका यांच्यात सामना होणार आहे.
इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तानुसार, भारतीय संघ व्यवस्थापन बुमराहला विश्रांती देऊ इच्छित आहे आणि त्याच्या पुनरागमनाची घाई करत नाही. तथापि, भारताला शनिवारी अमेरिकेविरुद्ध होणाऱ्या १३ सदस्यीय संघातून अंतिम अकरा जणांची निवड करावी लागेल. कारण, बुमराह व्यतिरिक्त, वॉशिंग्टन सुंदर देखील संघाबाहेर आहे. सुंदर सध्या बेंगळुरू येथील सीओई येथे फिटनेस क्लिअरन्सची वाट पाहत आहे. भारतीय संघात त्याचा समावेश प्रलंबित आहे. शिवाय, हर्षित राणा टी-२० विश्वचषकातून बाहेर पडला आहे आणि त्याच्या जागी मोहम्मद सिराजचा समावेश करण्यात आला आहे.
Defeating history in sight as Team India begin their title defense against USA! 👊 Will the Men in Blue begin their campaign with a win? ✍️👇 ICC Men’s #T20WorldCup | #INDvUSA | SAT, FEB 7, 6 PM pic.twitter.com/rPhsVEPayT — Star Sports (@StarSportsIndia) February 7, 2026
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सराव सामन्यात राणाला गुडघ्याला दुखापत झाली होती. बीसीसीआयने एक प्रेस रिलीज जारी करून म्हटले आहे की, “तज्ज्ञांच्या अहवालांचा आणि स्कॅनचा आढावा घेतल्यानंतर, बीसीसीआयच्या वैद्यकीय पथकाने राणाला स्पर्धेत सहभागी होण्यास अयोग्य असल्याचे आढळून आले आहे. संघ व्यवस्थापन त्याला लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा देतो. हर्षित राणाच्या जागी मोहम्मद सिराज संघात सामील होईल.”
अमेरिकेविरुद्ध भारताकडून इशान किशन आणि अभिषेक शर्मा डावाची सुरुवात करतील. संजू सॅमसन खराब फॉर्ममुळे झगडत आहे आणि पुनरागमनानंतर शतक झळकावून किशनने संघात आपले स्थान पक्के केले आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या सराव सामन्यात किशनने ५३ धावांची धमाकेदार खेळी केली.






