श्रेयस अय्यरला दुखापत(फोटो-सोशल मीडिया)
Shreyas Iyer suffers major injury : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील तिसरा सामना शनिवार, २५ ऑक्टोबर रोजी सिडनी येथे खेळला गेला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा ९ विकेट्सने पराभव केला. परंतु, या सामन्यात भारतीय संघासाठी आणि भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी वाईट बातमी आली आली आहे. ऑस्ट्रेलियाच्या डावावेळी श्रेयस अय्यरला दुखापत झाली आणि तो मैदानाबाहेर गेला. आता सिडनीतील एका रुग्णालयात आहे. त्याच्यावर ICU मध्ये उपचार सुरू आहे. बीसीसीआयकडून उपकर्णधार श्रेयस अय्यरबाबत एक वैद्यकीय बुलेटिन जारी करण्यात आले आहे.
हेही वाचा : शतक झळकावल्यानंतर करुण नायरने निवडकर्त्यांवर साधला निशाणा! टीम इंडियामधून वगळल्याबद्दलचा व्यक्त केला राग
बीसीसीआयने श्रेयसच्या दुखापतीबाबत प्रेस रिलीज जाहीर केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, “श्रेयसच्या दुखापतीच्या स्कॅनमध्ये प्लीहाची दुखापत दिसून आली. त्याच्यावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर आहे आणि तो बरा होत आहे.” बीसीसीआयचे वैद्यकीय पथक, सिडनी आणि भारतातील तज्ञांशी सल्लामसलत करत असून, त्याच्या दुखापतीचे बारकाईने निरीक्षण करत आहे.
सिडनी वनडेमध्ये, रेनशॉ आणि अॅलेक्स कॅरीची जोडी चौथ्या विकेटसाठी अर्धशतकी मोठी भागीदारी करत होते. तेव्हा ३४ व्या षटकात, बॅकवर्ड पॉइंटवरून थर्ड मॅनकडे धावणाऱ्या श्रेयस अय्यरने अॅलेक्स कॅरीचा एक अप्रतिम झेल घेतला. यादरम्यान, श्रेयस अय्यरला दुखापत झाली आणि तो वेदनेने विव्हळत होता. त्याला डाव्या बरगडीला दुखापत झाली.
श्रेयस अय्यर हा नहेमीच त्याच्या संघाला प्रथम प्राधान्य देत असतो. आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये त्याचे ही चित्र स्पष्टपणे दिसून येते. या वर्षीच्या आयपीएल २०२५ च्या १८ व्या हंगामात त्याने आपल्या पंजाब संघाला नेतृत्वासोबतच आपल्या फलंदाजीच्या जोरावर आयपीएलच्या अंतिम फेरीत पोहचवले. तसेच चॅम्पियन ट्रॉफीमध्ये देखील त्याने आपल्या बॅटने संघाला वेळोवेळी मदत केली आणि भारताने चॅम्पियन ट्रॉफीचे विजेतेपद मिळवून देण्यात मोठी भूमिका बजवली. या स्पर्धेत तो सर्वाधिक धावा काढून दुसऱ्या स्थानी होता.
अय्यरने ४८ च्या सरासरीने ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये २९०० पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. ७२ एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याने ७३ झेल घेतले आहेत. शिवाय, १४ कसोटी सामन्यांमध्ये १५ झेल, ५१ टी-२० सामन्यांमध्ये १६, ८३ प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये ६५, १५४ लिस्ट ए सामन्यांमध्ये ६७ आणि आयपीएलसह सर्व २४० देशांतर्गत टी-२० सामन्यांमध्ये १०२ झेल घेतलेल्या श्रेयसने त्याच्या क्षेत्ररक्षणाचे त्याच्या संघात किती महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. ही आकडेवारी त्याची क्षमता सिद्ध करते आणि त्याला एक खास खेळाडू बनवते.
हेही वाचा : Shreyas Iyer ला रुग्णालयात दाखल केल्यानंतर BCCI ने त्यांच्या प्रकृतीबद्दल दिले मोठे विधान, वाचा सविस्तर






