फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामना: भारतीय संघाच्या फळीवर फारशा धावा नव्हत्या. गोलंदाजीत भारताला तिसऱ्या दिवशी कर्णधार जसप्रीत बुमराहची साथ मिळाली नाही. दुखापतीमुळे विराट कोहलीला कर्णधारपदाची धुरा सांभाळावी लागली. विराट कोहली नेहमीच त्याच्या खास अंदाजामुळे आणि त्याचे चाहते त्याला अग्रेसिव्ह अंदाजामध्ये पाहायला पसंत करतात. भारताच्या संघाने दोन्ही इनिंगमध्ये खराब फलंदाजी केल्यामुळे टीम इंडिया ऑस्ट्रेलियासमोर मोठी धावसंख्या उभी करू शकला नाही. विराट कोहलीला कर्णधार पाहून चाहते प्रचंड आनंदी झाले.
आता सोशल मीडियावर विराट कोहलीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे यामध्ये विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन क्रिकेट चाहत्यांचे तोंड बंद केले आहे. विराट कोहलीचे कर्णधारपद अव्वल दर्जाचे असल्याचे दिसून आले. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियन संघाच्या चाहत्यांनाही छेडले आणि त्यांना सँडपेपरच्या घटनेची आठवण करून दिली, जी ऑस्ट्रेलियन खेळाडूंनी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या केपटाऊन कसोटी सामन्यात केली होती. याशिवाय, त्यांनी आपल्या संघाच्या समर्थकांना उत्साही राहण्यास सांगितले.
VIRAT KOHLI REPLICATING THE SANDPAPER GATE INCIDENT. 🤣🔥pic.twitter.com/qRxgmBaqAh
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 5, 2025
विराट कोहली हा भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. सर्वाधिक सामने जिंकणाऱ्या कर्णधारांच्या यादीत त्याचा समावेश आहे. मात्र, २०२२ च्या सुरुवातीला त्याने कर्णधारपद सोडले आहे. आता रोहित शर्मा हे सामने खेळत नसल्याने त्याला कर्णधारपद सोपवण्यात आले आहे. त्याच्या जागी कर्णधार असलेला जसप्रीत बुमराह दुखापतीमुळे मैदानावर नाही. अशा परिस्थितीत, कर्णधार विराट कोहली उभा आहे, जो केवळ भारतीय खेळाडूंनाच सांभाळत नाही तर समर्थकांना उत्साही बनवण्याचे आणि ऑस्ट्रेलियन चाहत्यांना चिडवण्याचे काम करतो.
वास्तविक, स्टीव्ह स्मिथ आऊट झाल्यानंतर ऑस्ट्रेलियन समर्थक जोरात ओरडत होते. अशा स्थितीत विराट कोहलीने त्याला प्रत्युत्तर देत आपल्या पँटचे खिसे दाखवले की त्यात काहीही नाही आणि सँडपेपरही नाही. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथ, उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर आणि फलंदाज कॅमेरून बॅनक्रॉफ्ट यांनी २०१८ मध्ये केपटाऊनमध्ये चेंडूशी छेडछाड करण्यासाठी सँडपेपरचा वापर केला होता. त्यामुळे स्मिथ आणि वॉर्नरवर प्रत्येकी एक वर्षाची, तर बॅनक्रॉफ्टवर ९ महिन्यांची बंदी घालण्यात आली होती. तो मुद्दा अनेकदा समोर येतो आणि लोक चीटर चीटर ओरडत राहतात. मात्र, विराट कोहली नेहमीच स्टीव्ह स्मिथसोबत उभा दिसतो. २०१९ च्या विश्वचषकातही हेच पाहायला मिळाले.