फोटो सौजन्य - BCCI सोशल मीडिया
भारताची दुसऱ्या कसोटीत प्लेइंग ११ : टीम इंडियाने बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना रोहित शर्माच्या संघामध्ये नसताना खेळला आणि भारताच्या संघाने हा सामना जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली जिंकला आणि आता मालिकेमध्ये आघाडी घेतली आहे. रोहित शर्माचे आता संघामध्ये दुसऱ्या कसोटीमध्ये पुनरागमन होणार आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा जेव्हा कसोटी मालिका खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाला पोहोचला तेव्हा तो कोणत्या क्रमाने फलंदाजी करेल हा पहिला प्रश्न होता.
बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या सामन्यात केएल राहुलने यशस्वी जैस्वालसह डावाची सुरुवात केली. दुसऱ्या डावात २०० हून अधिक धावांची भागीदारी करून नवा विक्रम प्रस्थापित केला. हीच जोडी पंतप्रधान इलेव्हनविरुद्धही सलामीला आली. अशा स्थितीत रोहित दिवस-रात्र कसोटीत डावाची सलामी देणार की नाही, असा प्रश्न उपस्थित होणार आहे.
क्रीडा संबंधित बातमीसाठी येथे क्लिक करा
भारताचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियन पंतप्रधान इलेव्हन विरुद्धच्या गुलाबी चेंडूच्या सराव सामन्यात सर्वांना आश्चर्यचकित केले. कर्णधाराने आपली फलंदाजी केएल राहुलसाठी सोडून दिली. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत यशस्वी जैस्वालसोबतच्या चमकदार कामगिरीमुळे त्याने हे केले. पर्थ कसोटीत रोहितच्या अनुपस्थितीत सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या केएल राहुलने यशस्वी जैस्वालसोबत २०१ धावांची ऐतिहासिक भागीदारी केली. ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर कसोटी क्रिकेटमध्ये भारतीय फलंदाजांनी केलेली ही पहिली विकेटची सर्वोच्च भागीदारी होती.
केएल ओपन करेल, रोहित शर्माने दिली हिंट. या हालचालीनंतर चाहत्यांनी असा अंदाज लावला की टीम इंडिया दुसऱ्या कसोटीतही त्याच फलंदाजीच्या क्रमाने खेळेल. ऑस्ट्रेलियात चांगली लय साधणारी यशस्वी आणि केएल राहुलची जोडी विस्कळीत होणार नाही, असे दिसते.
भारताचा अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारानेही रोहित शर्माला दुसऱ्या कसोटीसाठी फलंदाजीचा क्रम न बदलण्याचा सल्ला दिला होता. त्याने कर्णधाराला केएल राहुल आणि जैस्वाल या सलामीच्या जोडीसोबत जाण्याचा सल्ला दिला. रोहित तिसऱ्या क्रमांकावर येऊ शकतो आणि गिलने पाचव्या क्रमांकावर खेळावे, असेही पुजाराने सांगितले.
भारताच्या संघासाठी सुरु असलेली ऑस्ट्रेलियाविरुद्ध ही मालिका वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. भारताचा संघ पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखाली खेळला. टीम इंडियाने पहिल्या इनिंगची सुरुवात खराब गेली पण गोलंदाजांनी खेळ सांभाळला आणि टीम इंडियाने कमालीची फलंदाजी दुसऱ्या इनिंगमध्ये करून भारताच्या संघाने सामना २९५ धावांनी जिंकला. भारतीय क्रिकेट चाहत्यांची नजर आता ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या सामन्यासाठी उत्सुक आहेत. भारताचा संघ कोणत्या खेळाडूंना दुसऱ्या सामन्यांमध्ये प्लेइंग ११ मध्ये जागा देणार आणि कोणाला बसवणार हे पाहणं महत्वाचं ठरेल. भारताच्या संघाला चार सामने जिंकणे अनिवार्य आहे तेव्हाच टीम इंडिया वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये स्थान पक्के करणार आहे.