रवी शास्त्री(फोटो-सोशल मिडिया)
IND Vs END : सध्या भारतीय संघातील सर्व खेळाडू इंडियन प्रीमियर लीग २०२५ मध्ये खेळण्यात मग्न आहेत. आयपीएलचे आतापर्यंत ४७ सामने खेळवून झाले आहेत. रोहित शर्मा, विराट कोहली, जसप्रीत बुमराह, ऋषभ पंत आणि मोहम्मद सिराज सारखे खेळाडू आपापल्या संघांसाठी उत्कृष्ट कामगिरी करताना दिसून येत आहेत. यावर्षी आयपीएल २५ मे रोजी शेवटचा सामना असेल. त्यानंतर भारतीय संघ ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेसाठी इंग्लंडचा दौऱ्यावर जाणार आहे.
या मालिकेत अनेक तरुण खेळाडू भारतीय संघासोबत असणार आहेत. या कालावधीत रोहित शर्मा आणि विराट कोहलीसारखे वरिष्ठ खेळाडू देखील सोबत असणार आहेत.परंतु, टीम इंडिया बहुतेक तरुण खेळाडूंच्या उपस्थितीत मालिका खेळेल असे मानले जात आहे. याआधी भारतीय संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक खुलासा केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, त्याने म्हटले आहे की टीम इंडियाचे तीन गोलंदाज भारतीय संघासाठी सर्वात महत्वाचे खेळाडू ठरतील.
हेही वाचा : Vaibhav sooryavanshi शतक झळकावताच झाला मालामाल! बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी केली मोठी घोषणा
टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यापूर्वी माजी भारतीय प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी एक मोठा मूलमंत्र दिला आहे. बुमराहला त्याच्या कामाच्या ताणाकडे खूप लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केलीय आहे. तो म्हणाला की, बुम्हारला दोन कसोटी सामन्यांनंतर विश्रांतीची गरज सणाऱ्य आहे. आदर्श परिस्थितीत, तो चार कसोटी सामने खेळू शकतो. पण जर तो उत्तम फॉर्ममध्ये राहिला तर त्याला पाचव्या कसोटी सामन्यातही खेळवणे शक्य होईल. तथापि, बुमराहच्या शरीराची स्थिती पाहूनच निर्णय घ्यावा लागणार आहे.
पुढे, शास्त्री म्हणाले की, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज हे इंग्लंड मालिकेत चांगला दबदबा राखू शकता. सिराजचे कौतुक करताना त्यांनी म्हटले की, त्याच्यात अद्भुत असा उत्साह आहे. त्याचा वेग उत्कृष्ट आहे आणि तो सातत्याने चांगली कामगिरी देखील करत आहे.
हेही वाचा : वैभव सूर्यवंशीने कोणाला केला पहिला कॉल? व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हीही व्हाल भावुक, Video Viral
भारत आणि इंग्लंड यांच्यातील पाच सामन्यांच्या कसोटी मालिका होणारहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना २० जून रोजी खेळला जाणार आहे. यानंतर, दुसरा सामना २ जुलै रोजी, तिसरा सामना १० जुलै रोजी, चौथा सामना २३ जुलै रोजी आणि पाचवा आणि शेवटचा कसोटी सामना ३१ जुलै रोजी खेळला जाईल.
काल आयपीएल २०२५ मधील ४७ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात खेळण्यात आला. हा सामन्यात राजस्थान रॉयल्सने एकतर्फी विजय मिळवला. सामन्यापूर्वी रियान परागने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करत २०९ धावा केल्या. प्रतिउत्तरात राजस्थानने हे लक्ष्य १६ व्या षटकातच पूर्ण केले. या सामन्यांमध्ये वैभव सूर्यवंशीबरोबरच यशस्वी जैस्वाल या दोघांनी तूफान फटकेबाजी करत सामना एकतर्फी जिंकला. काल झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सच्या संघाने त्यांच्या घरच्या मैदानावर गुजरात टायटन्सला ८ विकेटने पराभूत केले. हा सामना लक्षात राहिला तो म्हणजे १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीने लगावलेल्या शतकामुळे. त्याने अवघ्या ३५ चेंडूत १०० धावा केल्या.