शुभमन गिल(फोटो-सोशल मीडिया)
IND vs ENG : भारत आणि इंग्लंड यांच्यातील बहुप्रतिक्षित अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीचा पहिला सामना आजपासून सुरू होणार आहे. हेडिंग्ले, लीड्स येथे हा सामना खेळवण्यात येणार आहे. शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली भारतीय कसोटी संघ इंग्लंड विरुद्ध दोन हात करण्यासाठी मैदानात उतरणार आहे. ही एका नवीन युगाची सुरुवात मानली जात आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रविचंद्रन अश्विन सारखे दिग्गजांनी आधीच आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. त्यामुळे टीम इंडिया पहिल्यांदाच पूर्ण युवा संघासह सज्ज झाली आहे.
हेही वाचा : ENG vs IND : पहिल्या सामन्यात तिसऱ्या नंबरचा प्रश्न सुटला! BCCI ने व्हिडीओ शेअर करुन दिली माहिती
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेमध्ये शुभमन गिलछाया नेतृत्वाची कसोटी लागणार आहे. तसेच त्याच्यासाठी ही एक ऐतिहासिक संधी देखील असणार आहे. त्याला पहिल्यांदाच कसोटी संघाची कमान सोपवण्यात आली आहे. आज त्याचा कर्णधार म्हणून पदार्पण सामना असेल. तरुण कर्णधारासमोर संघाचे नेतृत्व करण्याचे तसेच वरिष्ठ खेळाडूंची भरपाई भरून काढण्याची जबाबदारी असणार आहे. भारतीय क्रिकेट बोर्ड आणि चाहत्यांच्या नजरा गिलच्या रणनीती आणि नेतृत्व कौशल्यावर असणार आहेत.
टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा सामन्यापूर्वी म्हणाला की “हा संघ पूर्णपणे संतुलित आहे आणि सर्व खेळाडू एकमेकांशी समन्वय साधून खेळण्यास सज्ज आहेत.” तसेच तो पुढे म्हणाला की, आम्हाला विश्वास आहे की, तरुण खेळाडू जबाबदारी घेतील आणि कसोटी क्रिकेटमध्ये भारताची परंपरा पुढे नेतील.”
टीम इंडियाचा अनुभवी फलंदाज केएल राहुलचा देखील संघात समावेश आहे. जो तरुण खेळाडूंसाठी मार्गदर्शकाची भूमिका वठवू शकतो. त्याच्या अनुभवामुळे आणि शांत स्वभावामुळे ड्रेसिंग रूम बळकट होण्याची आशा आहे.
We are set for the series opener 👌 👌#TeamIndia | #ENGvIND pic.twitter.com/xAbVDUsUdp — BCCI (@BCCI) June 20, 2025
टीम इंडियाचे नवे प्रशिक्षक गौतम गंभीर इंग्लंडच्या खेळपट्ट्या आणि परिस्थिती चांगल्या प्रकारे जाणून आहे. एक खेळाडू म्हणून, त्याने येथे अनेक सामने देखील खेळले आहेत आणि त्याचा अनुभव रणनीती ठरवण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. वेगवान स्विंग आणि सीम हालचालींना तोंड देण्यासाठी गंभीरने खेळाडूंना विशेष अभ्यास करून घेतला आहे.
हेही वाचा : भारताचे सर्वात तरुण कसोटी कर्णधार कोणते? शुभमन गिल कोणत्या स्थानावर? धोनीचाही समावेश
इंग्लंड संघ बेन स्टोक्सच्या नेतृत्वाखाली मैदानात उतरणार आहे. आक्रमक कर्णधारपदासाठी ओळखला जाणारा स्टोक्स भारताला चांगली टक्कर देण्यास सज्ज झाला आहे. इंग्लंडचा संघ घरच्या परिस्थितीत खेळण्याचा नक्कीच फायदा घेण्याचा प्रयत्न करणार आहे.