ind vs nz Online Betting Racket
भारत विरुद्ध न्यूझीलंड सामन्यावर ऑनलाइन सट्टा सुरू असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार पथकाने दर्यापूर येथील कच्छीपुरा बनोसा भागात राहणारा शहबाज सलीम घानीवाले (२८) याच्या घरावर छापा टाकला. त्यावेळी तो लॅपटॉप आणि मोबाईलच्या साहाय्याने ‘जय श्री राम’ नावाच्या सट्टा अॅपद्वारे ग्राहकांना लिंक देऊन सट्टा घेत असल्याचे आढळून आले.
पोलिसांनी त्याच्याकडून लॅपटॉप, २ मोबाइल फोन आणि इतर साहित्य, असा एकूण ७१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. शहबाज घानीवाले याच्याकडे चौकशी केली असता, या सहुंचाची अॅप लिंक मंगरूळपीर येथील नितीन बबनराव ठाकरे (४०) याने पुरविल्याचे समोर आले. या माहितीच्या आधारे पोलिसांनी मंगरूळपीर येथून नितीन ठाकरे यालाही ताब्यात घेतले. या दोघांविरुद्ध दर्यापूर पोलिस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
ही कारवाई पोलिस निरीक्षक अशोक लांडे, पोलिस उपनिरीक्षक सागर हटवार आणि त्यांच्या पथकाने केली, यामध्ये लावण्यासाठी बुकी ग्राहकांकडून बेट ऑनलाइन पेमेंट स्वीकारत असल्याचे समजते. मंगरूळपीर येथील सलीम – घानीवाले यांची नावे समोर आल्याने वाशिम जिल्हा सायबर सेल आणि वाशीम स्थानिक गुन्हे शाखेने मंगरूळपीर परिसरावर विशेष लक्ष केंद्रित केल्याचे समजते.






