एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन(फोटो-सोशल मीडिया)
Aiden Markram and Ryan Rickelton create history : दक्षिण आफ्रिका आणि भारत यांच्यात गुवाहाटी येथे दुसरी कसोटी खेळली जात आहे. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने चांगलीच पकड निर्माण केली आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेची सलामी जोडी, एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन यांनी या सामन्यात एक मोठा टप्पा गाठला आहे. गुवाहाटी येथे झालेल्या भारताविरुद्धच्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये ५० पेक्षा जास्त धावांची सलामी भागीदारी रचली आहे, या कामगिरीने त्यांनी इतिहास रचला आहे.
एडेन मार्कराम आणि रायन रिकेल्टन यांनी सोमवार, २५ नोव्हेंबर रोजी दुसऱ्या सामन्याच्या चौथ्या दिवशी अर्धशतकी भागीदारी रचून हा पराक्रम केला आहे. २००८ नंतर दक्षिण आफ्रिकेसाठी कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये अर्धशतके झळकावणारी ही पहिली जोडी बनली आही. तसेच भारतात असे करणारी ही दक्षिण आफ्रिकेची चौथी जोडी देखील ठरली आहे.
शनिवारी (२२ नोव्हेंबर) पहिल्या डावात मार्कराम आणि रिकेल्टन यांनी २६.५ षटकांत पहिल्या विकेटसाठी ८२ धावंची भागीदारी केलीअ आणि मंगळवारी दुसऱ्या डावात १८.३ षटकांत आपल्या संघासाठी पहिल्या विकेटसाठी ५९ धावा जोडल्या आहेत. भारतात खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावात किमान ५० धावा करणारी दक्षिण आफ्रिकेची शेवटची ग्रॅमी स्मिथ आणि नील मॅकेन्झी ही सलामी जोडी राहिली आहे. मार्च २००८ मध्ये चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेल्या कसोटीत स्मिथ आणि मॅकेन्झी यांनी पहिल्या डावात १३२ धावा आणि दुसऱ्या डावात पहिल्या विकेटसाठी ५३ धावांची भागीदारी केली होती.
चौथ्या दिवशी सकाळी रिकेल्टनला रवींद्र जडेजाने ३५ धावांवर बाद केले. रिकी पॉन्टिंगने ६४ चेंडूंचा सामना केला आणि चार चौकार मारले. रिकेल्टननेही पहिल्या डावात ३५ धावा केल्या. चालू सामन्याच्या पहिल्या दिवशी त्याने ८२ चेंडूंचा सामना केला आणि पाच चौकार मारले. दुसरीकडे, गुवाहाटी कसोटीच्या पहिल्या डावात मार्करामने ८१ चेंडूत पाच चौकार मारून ३८ धावा फटकावल्या. दुसऱ्या डावात मार्कराम २९ धावांवर माघारी परतला. दोन्ही सलामीवीरांना रवींद्र जडेजाने आपली शिकार बनवले.
हेही वाचा : अरे बापरे…आइसलँड क्रिकेटने उडवली गौतम गंभीरची खिल्ली! सोशल मिडियावर काही क्षणातच पोस्ट व्हायरल
त्याच्या फलंदाजीव्यतिरिक्त, मार्कराम चालू सामन्यात त्याच्या क्षेत्ररक्षणाने देखील चांगलाच चर्चेत आला आहे. त्याने दुसऱ्या कसोटीच्या तिसऱ्या दिवशी, पाच झेल तिळे आहेत. ज्यामुळे त्याने कसोटी सामन्याच्या एकाच डावात आउटफिल्डरने सर्वाधिक झेल घेण्याच्या जागतिक विक्रमाची बरोबरी साधली आहे. तो सामन्याच्या एकाच डावात पाच झेल घेणारा १७ वा आउटफिल्डर ठरला आहे.






