Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

IND vs SA : गौतम गंभीर माझा नातेवाईक नाही… दुसऱ्या अपमानास्पद पराभवानंतर आर. अश्विनने का केले असे विधान?

भारताच्याच दिग्गजांनीच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या देखील कोचने भारताला खराब पद्धतीने ट्रोल केले. या संदर्भात, माजी भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने भारतीय खेळाडूंवर टीका करताना एक कठोर सत्य उघड केले आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: Nov 27, 2025 | 01:12 PM
फोटो सौजन्य - सोशल मिडिया

फोटो सौजन्य - सोशल मिडिया

Follow Us
Close
Follow Us:

टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका गमावली आहे. भारताच्या या निराशाजनक कामगिरीनंतर सोशल मिडियावर मोठ्या प्रमाणात खेळाडूंवर त्याचबरोबर गौतम गंभीरवर मोठ्या प्रमाणात टीका केली जात आहे. कोलकाता येथे झालेल्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघाला आफ्रिकन संघाने ४०८ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव पत्करावा लागला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने त्यांच्या घरच्या मैदानावर टीम इंडियाचा क्लीन स्वीप पूर्ण केला आणि २५ वर्षांनंतर मालिका २-० ने जिंकली.

या कसोटी मालिकेत टीम इंडियाची कामगिरी अत्यंत निराशाजनक राहिली आहे. त्यानंतर अनेक क्रिकेट दिग्गजांनी संघावर टीका केली आहे आणि खेळाडूंना लक्ष्य केले आहे. सोशल मिडियावर दिग्गजांचे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत. भारताच्याच दिग्गजांनीच नाही तर दक्षिण आफ्रिकेच्या देखील कोचने भारताला खराब पद्धतीने ट्रोल केले. या संदर्भात, माजी भारतीय ऑफस्पिनर रविचंद्रन अश्विनने भारतीय खेळाडूंवर टीका करताना एक कठोर सत्य उघड केले आहे.

गौतम गंभीरच्या कोचिंगमध्ये लागला भारतीय कसोटी क्रिकेटला कलंक! गमावल्या 8 कसोटी, 3 मालिका…पराभवाचं कारण अस्पष्ट

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या घरच्या कसोटी मालिकेत टीम इंडियाच्या व्हाईटवॉशनंतर आर अश्विनने नाराजी व्यक्त केली. अश्विनने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “२०१२ मध्ये इंग्लंडविरुद्ध पराभव झाल्यानंतर मी स्वतःला सांगितले होते की जर आपण पुन्हा एकदा घरच्या मालिकेत हरलो तर मी निवृत्त होईन. न्यूझीलंड मालिकेतील पराभव माझ्यासाठी खूप मोठा धक्का होता. त्यामुळे मी तुटलो आणि आज मी घरी बसलो आहे.” तो पुढे म्हणाला, “मला आशा आहे की या मालिकेनंतर खेळाडूंसोबतही असेच घडेल आणि ते स्वतःला बदलतील.”

Ravi Ashwin said, “I made myself a promise after the series loss against England in 2012 that if we ever lose another home series, I’ll retire. New Zealand series loss is eventually the reason why I am sitting at home today, it broke me”. (Ash Ki Baat). pic.twitter.com/FStbxQFThs — Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 26, 2025

न्यूझीलंडमधील व्हाईटवॉशनंतर, अश्विनने गेल्या वर्षीच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या मध्यभागी अचानक निवृत्तीची घोषणा केली. २०२४-२५ बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या तिसऱ्या कसोटी (ब्रिस्बेन) नंतर त्याने निवृत्तीची घोषणा करून सर्वांना आश्चर्यचकित केले. त्याने स्पष्टपणे सांगितले की त्याचा निर्णय कोणत्याही दबावाखाली नव्हता.

तो म्हणाला, “मला कोणीही संघ सोडण्यास सांगितले नाही. उलट, दोन-तीन जणांनी मला निवृत्तीविरुद्ध सल्ला दिला. त्यांना मी अधिक खेळावे असे वाटत होते.” अश्विन पुढे म्हणाले की, रोहित शर्मा आणि गौतम गंभीर यांनीही त्याला पुनर्विचार करण्याचा सल्ला दिला. तो पुढे म्हणाला, “निवृत्ती हा वैयक्तिक निर्णय आहे. हे निर्णय इतरांनी घेतलेले नाहीत, तर ते स्वतः घेतलेले आहेत.”

Web Title: Ind vs sa gautam gambhir is not my relative why did r ashwin make such a statement after the second humiliating defeat

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 27, 2025 | 12:59 PM

Topics:  

  • cricket
  • Gautam Gambhir
  • Ind Vs Sa
  • India vs South Africa
  • R Ashwin
  • Sports

संबंधित बातम्या

“गौतम गंभीर हाय हाय…!” चाहत्यांच्या संतापात मोहम्मद सिराजने आपल्या प्रशिक्षकासाठी केले असे काही; Video Viral
1

“गौतम गंभीर हाय हाय…!” चाहत्यांच्या संतापात मोहम्मद सिराजने आपल्या प्रशिक्षकासाठी केले असे काही; Video Viral

WPL Auction 2026 : पहिल्या WPL मेगा लिलावात बोली लावणारी मल्लिका सागर कोण आहे?
2

WPL Auction 2026 : पहिल्या WPL मेगा लिलावात बोली लावणारी मल्लिका सागर कोण आहे?

WPL 2026 Auction Live Streaming : WPL मेगा ऑक्शन कधी आणि कुठे पाहता येणार, कसा घेता येईल मोफत आनंद? वाचा सविस्तर
3

WPL 2026 Auction Live Streaming : WPL मेगा ऑक्शन कधी आणि कुठे पाहता येणार, कसा घेता येईल मोफत आनंद? वाचा सविस्तर

IND vs SA सामन्यानंतर प्लाईटला उशीर झाल्यानंतर मोहम्मद सिराजने संतापला! सोशल मिडियावर व्यक्त केला राग
4

IND vs SA सामन्यानंतर प्लाईटला उशीर झाल्यानंतर मोहम्मद सिराजने संतापला! सोशल मिडियावर व्यक्त केला राग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.