फोटो सौजन्य - बीसीसीआय सोशल मिडिया
गुवाहाटी येथे बुधवारी दक्षिण आफ्रिकेने भारताचा २०० असा पराभव करून कसोटी मालिका जिंकली, ज्यामुळे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नेतृत्वाखाली यजमान संघाला तिसरा कसोटी मालिका पराभव पत्करावा लागला. गंभीरचा १६ महिन्यांचा कार्यकाळ हा एक चढउताराचा प्रवास होता. या काळात भारताला घरच्या मैदानावर न्यूझीलंडकडून ०-३, ऑस्ट्रेलियाकडून १-3 आणि आता दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ असा पराभव पत्करावा लागला. प्रशिक्षक म्हणून गंभीरचा कसोटी प्रशिक्षकपदाचा विक्रम १९ सामन्यांपैकी ७ विजय, १० पराभव आणि २ अनिर्णित असा आहे, तर विजयाची टक्केवारी फक्त ३६.८२ आहे. तो डंकन फ्लेचरपेक्षा फक्त पुढे आहे, ज्यांच्या विजयाची टक्केवारी ३३.३३ आहे
न्यूझीलंडने भारताला ८ विकेट्सने पराभूत केले, ३६ वर्षांनतर पहिल्यांदाच भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध कसोटी मालिका गमावली. न्यूझीलंडच्या वेगवान गोलंदाजांनी भारताला ४६ धावामध्ये गुंडाळले, घरच्या मैदानावर भारत ५० पेक्षा कमी धावांमध्ये गुंडाळण्याची ही पहिलीच वेळ होती. न्यूझीलंडने भारताला ११३ धावांनी केले पराभूत केले होते, न्यूझीलंडच्या फिरकीपटूंनी भारताला खूप त्रास दिला. ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसऱ्या सामन्यात मिचेल सेंटनरने अजाज पटेल आणि ग्लेन फिलिप्सच्या साथीने १३ विकेट्स घेतल्या आणि भारताला पराभवाचा सामना करावा लागला.
न्यूझीलंडने भारताला २५ घावांनी हरविले आर. अश्विन आणि रवींद्र जडेजा यांनी मिळून दुसन्या न्यूझीलंडला १७४ धावांमध्ये मुडाळले, ज्यामुळे १४७० वावांचे लक्ष्य सोपे वाटले. ऋषभ पंतच्या ५७चेंडूत ६४ धावा असूनही पटेल (६/५७) आणि फिलिप्स (३/४२) यांनी आघाडी घेतली, त्यानंतर भारत १२१ धावांमध्ये गडगडला.
ऑस्ट्रेलियाची भारतावर 10 विकेट्सने मात पर्थमाधील २९५ धावांच्या विजयानंतरचा वेग दुसऱ्या डे-नाईट कसोटीतही कायम राहिला, मिशेल स्टार्क (६/४८) आणि ट्रॅव्हिस हेड (१४०) यांनी ऑस्ट्रेलियाला वर्चस्व गाजवण्यास मदत केली. दुसऱ्या डावात कर्णधार पेंट कमिन्स (५/५७) यांनी भारताला गुंडाळले आणि विजयासाठी फक्त १९ धावांचे लक्ष्य ठेवले, जे ऑस्ट्रेलियाने न गमावता साध्य केले.
ऑस्ट्रेलियाकडून भारताचा १८४ धावांनी पराभव ब्रिस्बेनमधील खराब हवामानामुळे भारताला संभाव्य पराभवापासून वाचवले. त्यानंतर तिसऱ्या कसोटीनंतर अश्विनने निवृत्ती घेतली, चौथ्या कसोटीत, स्टीव्ह स्मिथच्या १४० धावांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने जवळजवळ ५०० धावा केल्या, पदार्पण करणाऱ्या नितीश कुमार रेड्डी यांने शतक ठोकले तरी, भारत १०० पेक्षा जास्त धावांनी मागे पडला, ३४० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना फक्त यशस्वी जयस्वाल (२०८ वैडूत ८४ धावा) केल्या होत्या, पण तो टिकून राहू शकला नाही, त्यानंतर संथ १५५ धावांवर कोसळला.
मालिकेत १-२ ने पिछाडीवर असूनही भारताला मालिका बरोबरीत आणण्याची संधी होती, परंतु स्कॉट बोलैंड (३१ धावात चार, ४५ धावात ६) यांच्यासमोर फलंदाजी कोसळली. सुरुवातीला विकेट्स गमावल्यानंतरही, ऑस्ट्रेलियाने १६२ धावांचे लक्ष्य सहज गाठले. दक्षिण आफ्रिकेने भारताचा ३० धावांनी दुसऱ्यांदा पराभव केला, भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजांचे बळी पडले. सायमन हार्मर आणि त्याचा साथीदार माकों जॅन्सन यांनी भारताला १२४ धावांचे छोटे लक्ष्यही ओलांडण्यापासून रोखले. हार्मरने सामन्यात विकेट्स घेतल्या आणि भारत ९३ धावांवर बाद झाला.






