फोटो सौजन्य - Zimbabwe Cricket सोशल मिडिया
पाकिस्तान, श्रीलंका आणि झिम्बाब्वे यांच्यात तिरंगी मालिका सुरू आहे. पाकिस्तान आणि झिम्बाब्वे यांच्यातील सामना २३ नोव्हेंबर रोजी झाला. पाकिस्तानने हा सामना ६९ धावांनी जिंकला. उस्मान तारिकने हॅटट्रिक घेत पाकिस्तानसाठी धमाकेदार कामगिरी केली. त्याने पाकिस्तानसाठी शानदार खेळ केला आणि विजयात महत्त्वाची भूमिका बजावली. या विजयासह पाकिस्तानने तिरंगी मालिकेच्या अंतिम फेरीत स्थान निश्चित केले. प्रथम फलंदाजी करताना पाकिस्तानकडून साहिबजादा फरहानने ४१ चेंडूत ६३ धावा केल्या. सॅम अयुबनेही ८ चेंडूत १३ धावा केल्या.
बाबर आझमनेही ५२ चेंडूत ७४ धावा केल्या. फहीम अश्रफने ४ चेंडूत ३ धावा केल्या. फखर झमाननेही १० चेंडूत नाबाद २७ धावा केल्या. १९६ धावांच्या विशाल लक्ष्याचा पाठलाग करताना झिम्बाब्वेच्या ब्रायन बेनेटने ५ चेंडूत ९ धावा केल्या, तर तादिवानाशे मारुमानीने ५ चेंडूत ४ धावा केल्या. ब्रेंडन टेलरनेही ८ चेंडूत ८ धावा केल्या. झिम्बाब्वेकडून रायन बर्लने ४९ चेंडूत सर्वाधिक ६७ धावा केल्या, ज्यात ८ चौकार आणि २ षटकारांचा समावेश होता. झिम्बाब्वेचा संघ १९ षटकात १२६ धावांवर गारद झाला आणि पाकिस्तानने सामना ६९ धावांनी जिंकला.
या सामन्यात पाकिस्तानकडून २७ वर्षीय उस्मान तारिकने शानदार गोलंदाजी केली. त्याने हॅटट्रिक घेतली. १० वे षटक टाकण्यासाठी आलेल्या उस्मानने दुसऱ्या चेंडूवर टोनी मुनयोंगाला बाद केले. त्यानंतर तिसऱ्या चेंडूवर त्याने ताशिंगा मुसेकिवाला बाद केले आणि त्याला क्लीन बोल्ड केले. त्यानंतर, चौथ्या चेंडूवर वेलिंग्टन मसाकादझा बाद झाला. अशा प्रकारे, त्याने हॅटट्रिक घेऊन खळबळ उडवून दिली.
१० व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर तारिकने टोनी मुनयोंगाला बाद केले. त्यानंतर पुढच्याच चेंडूवर त्याने त्शिंगा मुसेकिवाला क्लीन बोल्ड केले. वेलिंग्टन मसाकादझाला शून्यावर बाद करून तारिकने आपली हॅटट्रिक पूर्ण केली. उस्मान तारिक आता टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये हॅटट्रिक घेणारा चौथा पाकिस्तानी गोलंदाज बनला आहे. त्याच्या आधी मोहम्मद हसनैन, फहीम अश्रफ आणि मोहम्मद नवाज यांनी पाकिस्तानकडून हॅटट्रिक घेतली आहे.
No answers for Usman Tariq in Rawalpindi 👊#PAKvZIM 📲 https://t.co/OUD2qYlnCj pic.twitter.com/dFkXnWvRvE — ICC (@ICC) November 24, 2025
फहीम अश्रफ विरुद्ध एसएल, अबू धाबी, 2017
मोहम्मद हसनैन वि एसएल, लाहोर, 2019
मोहम्मद नवाज वि AFG, शारजाह, 2025
उस्मान तारिक वि ZIM, रावळपिंडी, 2025*






