Vietnam Flood : व्हिएतनामला निसर्गाचा तडाखा! मुसळधार पावसामुळे हजारो कुटुंब बेघर, ९० जणांचा मृत्यू (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
व्हिएतनामवर घोंगावतय वादळी संकट ; हजारो लोकांचे स्थलांतर अन् उड्डाणेही रद्द
मीडिया रिपोर्टनुसार, या मुसळधार पावसामुळे व्हिएतनामध्ये अनेक घरे, रस्ते पाण्याखाली गेली आहेय अंदाजे १,८६,००० लोकांना याचा फटका बसला आहे. अनेक गुरुढोरे देखील पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत. आतापर्यंत देशाचे २ अब्ज डॉल्रसचे नुकसान झाले असल्याची वृत्त समोर आली आहे. तसेच ९० लोकांच्या मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. आपत्तींचा धोका वाढला असून मृत्यूचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ऑक्टोबरपासून व्हिएतनामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. यापूर्वी बुआलोई वादळ आणि रगासा वादळाने देखील प्रचंड कहर माजवला होता.अनेक लोक छतांवर अडकले आहेत. परिस्थिती अत्यंत भयानक आहे.
व्हिएतनामच्या पर्यटनाला फटका
या मुसळधार पावसामुळे लोकांनी व्हिएतनामसाठी बुक केलेल तिकीट्स, हॉटेल्स सर्वकाही रद्द केले आहे. यामुळे व्हिएतनामचे अब्जावधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सध्या बाधित प्रदेशांमध्ये मदत पोहचवण्याचा काम सुरु आहे. पुरामुळे अनेक भागात बिकट परिस्थिती आहे. लोकांना मदत पुरवठा करण्यात अडथळा येत आहे. पण सरकाने बचाव संस्था आणि अग्निशमन दलाला लोकांपर्यंत आवश्यक ती मदत पोहोचवण्याचे आदेश दिले आहेत.
सप्टेंबरमध्ये बुआलोई वादळाने व्हिएतनामला जोरदार धडक दिली होती. यामुळे मोठ्या प्रमाणावर विध्वंस झाला होता. मुसळधार पावसामुळे घरे, शाळा, पूल पाण्याखाली गेले होते. यावादळामुळे १२ लोकांचा मृत्यू झाला होता. तर याच्या दोन दिवसांपूर्वीच टायफून रगासाने देखील प्रचंड विध्वंस व्हिएतनामध्ये घडवून आणला होता. तर ऑगस्टमध्ये काजिकी वादळाने देखील मोठे नुकसान केले होते.
असा विनाश पूर्वी कधीही पाहिला नाही
सध्या परिस्थिती इतकी भंयकर आहे की लोकांना १९९३ च्या पुराची आठवण होत आहे. पण यंदाची परिस्थिती त्याकाळापेक्षा देखील अधिक बिकट असल्याचे स्थानिकांनी म्हटले आहे. परिस्थिती अशीच राहिली तर लोकांना अन्न संकटाचा देखील सामना करावा लागेल असे स्थानिक माध्यामंनी सांगितले आहे. सध्या पूर आणि भूस्खलनामुळे लोकांच्या स्थलांतराचे कार्य सुरु आहे.
Typhoon Bualoi: व्हिएतनामवर घोंगावतेय वादळी संकट; बुआलोई टायफूनमुळे देशातील हजारो लोकांचे स्थलांतर
Ans: व्हिएतनामध्ये सध्या मुसळधार पाऊस पडत असून पूर आणि भूस्खलनाचा धोका वाढला आहे. यामुळे अनेक घरे, रस्ते, शाळा इमारती पाण्याखील गेली आहेत.
Ans: व्हिएतनामच्या मुसळधार पावसात पूरात वाहून गेल्याने अनेकांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत ९० जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तसेच ३० लाख प्राणी पुरात वाहून गेले आहेत.






